शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Election 2020: मी मोदींचा हनुमान; भाजप आणि लोक जनशक्ती यांच्यात बिहारमध्ये जुंपली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 07:49 IST

चिराग पासवान हे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रशंसा करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका करतात.

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेल्या संबंधांचा वारंवार उल्लेख करून संभ्रम निर्माण करीत आहेत, असा थेट हल्ला भाजपने शुक्रवारी केला. पक्षाने म्हटले की, लोक जनशक्ती पक्षाशी भाजपची कोणतीही मैत्री नाही.

चिराग पासवान हे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रशंसा करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका करतात. यामुळे लोजप आणि भाजप यांच्यात काही मैत्री असावी, अशा चर्चा सुरू आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘लोक जनशक्ती पक्षाशी आमचे कोणतेही संबंध नाहीत, हे आम्हाला स्पष्ट करायचे आहे आणि असे संभ्रम निर्माण करणारे राजकारणही आम्हाला आवडणार नाही.’बिहारमध्ये मोदींच्या १२ सभा होणारपाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये १२ सभा घेणार आहेत. पहिली रॅली २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. बिहारचे निवडणूक प्रभारी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या सर्व सभा या रालोआच्या सभा असतील. यात मुख्यमंत्री नितीशकुमार आणि रालोआच्या घटक पक्षांचे नेते उपस्थित असतील. मोदी हे बिहारमध्ये १२ सभा घेतील. २३ आॅक्टोबर रोजी सासाराममध्ये पहिली सभा, दुसरी सभा गयामध्ये, तर तिसरी भागलपूरमध्ये होईल. फडणवीस म्हणाले की, २८ आॅक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांची दरभंगामध्ये रॅली होईल. त्यानंतर मुजफ्फरपूरमध्ये आणि तिसरी रॅली पाटण्यात होईल. १ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी पुन्हा राज्यात येतील.मी मोदींचा हनुमान -पासवानपाटणा : मी पंतप्रधान मोदी यांचा ‘हनुमान’ असून, मोदी माझ्या हृदयात असतात. जर माझ्या टीकाकारांना हवे असेल, तर ते माझे हृदय उघडून पाहू शकतात. मोदी यांचे छायाचित्र वापरण्याची मला गरज नाही, असे चिराग पासवान यांनी शुक्रवारी म्हटले.

टॅग्स :BJPभाजपाBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमार