शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Bihar Assembly Election 2020 : ‘मोदी से बैर नही, नितीश तेरी खैर नही’, बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट

By बाळकृष्ण परब | Published: October 03, 2020 3:43 PM

Bihar Assembly Election 2020 Marathi News : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएमधील घटकपक्ष असलेल्या भाजपा, एलजेपी आणि जेडीयूमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तसेच गजर पडल्यास एलजेपी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे'मोदी से बैर नही, नितीश तेरी खैर नही' अशा आशयाचे पोस्टर्स बिहारमध्ये लागले आहेतया पोस्टरच्या माध्यमातून लोकजनशक्ती पार्टीने आपली नाराजी भाजपावर नाही तर जेडीयूवर आहे, असे संकेत पोस्टरच्या माध्यमातून दिले २०१८ मध्ये झालेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीवेळी अशाच प्रकारचे पोस्टर्स राजस्थानमध्ये लागले होते

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा झाल्यापासून राज्यातील राजकारण आता बऱ्यापैकी तापू लागले आहे. एकीकडे विरोधी आरजेडी- काँग्रेस आघाडीमधील जागावाटप बऱ्यापैकी निश्चित झाले असले तरी सत्ताधारी जेडीयू-भाजपा-एलजेपी यांच्यातील जागावाटपाबाबत अद्याप खेचाखेची सुरू आहे. जागावाटपाबाबत तिन्ही पक्षात एकमत होत नसल्याने चिराग पासवान यांनी वेट अँड वॉचचे धोरण स्वीकारले आहे. दरम्यान, बिहारमध्ये लागलेले सूचक पोस्टर राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे.'मोदी से बैर नही, नितीश तेरी खैर नही' अशा आशयाचे पोस्टर्स बिहारमध्ये लागले आहेत. या पोस्टरच्या माध्यमातून लोकजनशक्ती पार्टीने (एलजेपी) आपली नाराजी भाजपावर नाही तर जेडीयूवर आहे, असे संकेत  पोस्टरच्या माध्यमातून दिले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी खुर्चीच प्राथमिकताआहे, तर भाजपा आणि लोकजनशक्ती पार्टीसाठी बिहार प्राथमिकता असल्याचे या पोस्टरच्या माध्यमातून दर्शवण्यात आले आहे.२०१८ मध्ये झालेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीवेळी अशाच प्रकारचे पोस्टर्स राजस्थानमध्ये लागले होते. तेव्हा मोदी से बैर नही, वसुंधरा तेरी खैर नही, असे पोस्टर्स लागले होते. त्यानंतर राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांचे सरकार जाऊन काँग्रेसचे सरकार आले होते.

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएमधील घटकपक्ष असलेल्या भाजपा, एलजेपी आणि जेडीयूमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तसेच गजर पडल्यास एलजेपी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. एलजेपीच्या संसदीय मंडळाची आज संध्याकाळी याबाबत एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे. एलजेपीचे प्रमुख रामविलास पासवान सध्या आजारी आहेत त्यामुळे जागावाटपाबाबतच्या सर्व चर्चांची जबाबदारी चिराग पासवान यांनी सांभाळलेली आहे.दरम्यान, बिहारमध्ये एलजेपी एनडीएपासून वेगळी झाली तरी केंद्रात एलजेपीसोबतची आघाडी सुरू कायम राहील आणि रामविलास पासवान केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून कायम राहतील. तसेच बिहारमध्ये भाजपाविरोधात एलजेपी उमेदवार उभे करणार नाही. मात्री जेडीयूविरोधात प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभे केले जातील, असे संकेत चिगार पासवान यांनी दिले आहेत.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020Lok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमार