शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

अजित पवार- फडणवीस यांच्यात भर विधानसभेत जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 6:53 AM

वैधानिक विकास मंडळाचा मुद्दा विधानसभेत तापला , आधी आमदार नियुक्ती मग मंडळांना मुदतवाढ, या अजित पवार यांच्या विधानाचा निषेध करत विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यपालांनी  विधान परिषदेच्या १२ सदस्यांची नियुक्ती आज करावी, आजच राज्यातील विकास मंडळांना आपले सरकार मुदतवाढ देईल, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत करताच संतप्त झालेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, राज्याच्या मागास भागांना ओलीस ठेवण्याचा हा प्रकार असून ही भीक नाही; आम्ही भिकारी नाही, आमच्या हक्काचं घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत पवार यांच्या विधानाचा निषेध केला. या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्यागही केला. 

वित्तमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या मांडल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी या मागण्यांमधील रकमेचे आणि ८ मार्चला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातील निधीचे समन्यायी वाटप राज्यपालांच्या सूत्रांनुसार होणार आहे का, अशी विचारणा केली, तसेच विकास मंडळांना मुदतवाढ देण्याची जोरदार मागणीही केली. मंडळांना राजकीय डावपेचात अडकवू नका, असे ते म्हणाले. त्यावर, अजित पवार यांनी मंडळांना मुदतवाढ देण्याची आमची भूमिका आहे, असे सांगतानाच आधी राज्यपालांनी आमदारांची नियुक्ती करावी, आम्ही लगेच मुदतवाढ देऊ, असे विधान केले. 

त्यावर अजित पवार म्हणाले की, राज्यपालांनी बारा आमदारांची नियुक्ती आज जाहीर करावी, आजच मंडळांना मुदतवाढ देऊ. फडणवीस त्यावर चांगलेच संतप्त झाले. अजितदादांच्या मनातलं आज ओठावर आलं. किती राजकारण करता? आमदार नियुक्त्यांचा विकास मंडळांच्या मुदतवाढीशी काय संबंध? हा राज्याचा विषय आहे अन् त्याचे तुम्ही असे राजकारण करत असाल तर जनता माफ करणार नाही. राज्यपाल कोणा एका पक्षाचे आहेत का? आम्ही संघर्ष करू, मंडळं हा आमचा संवैधानिक अधिकार आहे, तो आम्ही मिळविल्याशिवाय राहणार नाही, असे फडणवीस म्हणाले. काँग्रेसचे आ. नाना पटोले यांनी गेल्या पाच वर्षांत विदर्भाचा बॅकलॉग किती वाढला, याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. त्यावर पवार यांनी त्याबाबतची आकडेवारी सरकार मांडेल, असे स्पष्ट केले.‘राज्यपालांची भूमिका संशयास्पद आहे’ (पान ५ वर)

विरोधकांचा सभात्यागआधी आमदार नियुक्ती मग मंडळांना मुदतवाढ, या अजित पवार यांच्या विधानाचा निषेध करत विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभा