शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

खराब वाहिनीमुळे खडकीत पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: October 27, 2015 01:00 IST

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पुरेसा पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, येथील जुन्या जलवाहिनी खराब होऊन सडल्या आहेत.

पिंपरी : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पुरेसा पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, येथील जुन्या जलवाहिनी खराब होऊन सडल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरते. खराब वाहिनी बदलून घ्यावी, अशा सूचना पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डास केली आहे. या संदर्भात बोर्डास लवकरच पत्र देण्यात येणार आहे. खडकी भागातील पाणी प्रश्नांबाबत चतु:शृंगी येथील वीजवितरण विभागाच्या प्रकाशगड कार्यालयात नुकतीच बैठक झाली. या वेळी आमदार विजय काळे, कॅन्टोन्मेंटचे नगरसेवक दुर्योधन भापकर, नगरसेविका कार्तिकी हिवरकर, भाजपाचे पदाधिकारी फ्रान्सिस डेव्हिड, अनिल मेहता, अमर देशपांडे, बोर्डाचे वरिष्ठ अभियंता अरुण गोडबोले, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता आढारी, उपअभियंता श्रीधर कामत, कनिष्ठ अभियंता सुधीर सोनावणे, तसेच, एमएसईबीचे अधिकारी उपस्थित होते. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले,‘‘खडकीतील सर्व भागांतील पाण्याचा दाब तपासण्यात येणार आहे. त्याचा अहवाल बोर्डास दिला जाईल. खडकीस पूर्ण क्षमतेने आणि योग्य प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. येथील जलवाहिन्या १९८६मध्ये टाकण्यात आल्या आहेत. त्या खराब होऊन सडल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत जिरून वाया जात आहे. यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही वाहिनी बदलावी. वाहिन्या बदलल्यास २ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च महापालिका करणार नाही. तो बोर्डाने करावा. यासह सर्व बाबीचे अहवाल बोर्डास देण्यात येणार आहे.’’ पाणी पुरवठ्याची जबाबदारी कॅन्टोन्मेंटने घ्यावी,या मागणीचा पुनरुच्चार अधिकाऱ्यांनी केला. पाणीपुरवठा विभागाकडून अहवाल आल्यानंतर बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत त्यावर चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. हा खर्च करणे बोर्डास परवडणार नसल्याचे बोर्ड अधिकारी आणि नगरसेवकांनी सांगितले. अनधिकृत नळजोड खंडित करण्याची कारवाई पाणीपुरवठा विभाग व कॅन्टोन्मेंट बोर्डाने करावी, असा सल्ला आमदार काळे यांनी दिला. (प्रतिनिधी)