शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी मार्गात सांडपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2015 04:16 IST

शंकरवाडी, कासारवाडी येथील रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्गातून सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने हा मार्ग नेहमीच तुंबून राहतो. पावसाळ्यात

पिंपरी : शंकरवाडी, कासारवाडी येथील रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्गातून सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने हा मार्ग नेहमीच तुंबून राहतो. पावसाळ्यात तर गुडघाभर पाणी साचते. नाइलाजास्तव या घाण पाण्यातूनच वाहनचालक आणि पादचाऱ्यांना ये-जा करावे लागत आहे. घाण पाण्यातून वाहतूक करावी लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कासारवाडी, पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी परिसरातील वाहनचालक जवळचा मार्ग म्हणून शंकरवाडी येथील रेल्वे मार्गाच्या खालील भुयारातून नागरिक ये-जा करतात. महामार्गाकडे तसेच पिंपरी आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकडे जाण्यासाठी हा रस्ता सोयीस्कर आहे. यामुळे येथून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. तीव्र उतारावर भुयारी मार्ग असल्याने थोडा जरी पाऊस झाल्यास येथे ग्रेड सेपरेटरमधील पाणी आणि नाल्याचे सांडपाणी जमा होते. हे पाणी जाण्यास वाट नसल्याने ते तेथेच साचून राहते. मोठ्या पावसात गुडघाभर पाणी जमा होते. वाहनांना या घाण पाण्यातून जावे लागते. विशेषत: दुचाकीस्वाराच्या पायांवर आणि गाडीवर सांडपाणी उडते. वेगातील मोटारीमुळे दुचाकी आणि पादचाऱ्यांच्या अंगावर सांडपाणी उडते. सांडपाणी उडणार नाही, याची दक्षता घेत दुचाकीस्वार आणि सायकलस्वार येथून वाहन पुढे नेतात. भुयारी मार्गाशेजारीच मोठा नाला आहे. नाल्यात हे सांडपाणी जाण्याची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे सांडपाणी मार्गावरच अनेक दिवस साचून राहते. ऊन आणि वाहनांची ये-जा झाल्याने हे पाणी सुकून जाते. मात्र, अनेक दिवस चिखल तसाच राहतो. चिखलात दुचाकीस्वार घसरून पडतात. काही वाहनचालक हा मार्ग टाळून नाशिक फाटा दुमजली उड्डाणपुलावरून एक ते दीड किलोमीटर अधिक अंतराचा वळसा घालून ये- जा करतात. नाशिक फाटा दुमजली उड्डाणपुलावरून पिंपरीच्या दिशेन जाण्यास रस्ता नसल्याने वाहनचालकांना याच भुयारी मार्गाचा वापर करावा लागतो. हा प्रकार अनेक वर्षांपासून कायम आहे. (प्रतिनिधी)