शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

  गणेश विसर्जनवेळी इंद्रायणीत बुडून दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 00:11 IST

Pimpari News: एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हवालदार वस्ती, आळंदी रोड येथील इंद्रायणी नदीत रविवारी (दि. १९) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

आळंदी : इंद्रायणी नदीत गणपती विसर्जनाच्या वेळी दोन तरुण गणेशभक्तांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधला आहे. तर बुडालेल्या अन्य एकाला शोधण्याचे काम सुरू आहे. प्रज्वल रघुनाथ काळे (वय १८) व दत्ता आबासाहेब ठोंंबरे (वय २०) अशी या दुर्घटनेत नदीपात्रात बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. त्यापैकी प्रज्वल काळे याचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.             पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आळंदी रस्त्यावरील हवालदार वस्तीजवळ रविवारी (दि.१९) सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आळंदीलगत डुडुळगावच्या माऊली वस्ती येथील ठोंंबरे कुटुंबीय इंद्रायणीकडे गणेश विसर्जनासाठी आले होते. त्यांच्या पैकी शिवाजी अर्जुन ठोंबरे (वय ३०) नितीन अर्जुन ठोंंबरे (वय ३९), दत्ता आबासाहेब ठोंंबरे (वय २०) आणि प्रज्वल रघुनाथ काळे (वय १८) हे चौघे पाण्यात मूर्ती विसर्जनसाठी उतरले. नदी पात्रात मध्यभागी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दत्ता ठोंबरे व प्रज्वल काळे हे पाण्यात बुडाले. बुडालेल्या दोघांनाही पोहता येत नव्हते.                   घटनास्थळी भोसरी एमआयडीसी पोलीस, आळंदी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने शोध मोहिम हाती घेतली. त्यात प्रज्वल काळे याचा मृतदेह पाण्यात आढळून आला असून दत्ता ठोंबरेचा शोध सुरू आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड