शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीनंतर कार्यकर्ते अडचणीत

By admin | Updated: April 14, 2017 04:23 IST

महापालिका निवडणूक फेब्रुवारीत झाली अन् काही दिवसांतच कार्यकर्ते अडचणीत आले आहेत. निवडणुकीत पराभूत झालेल्यांनी परिसरातील ज्या कार्यकर्त्यांनी आपले काम

पिंपरी : महापालिका निवडणूक फेब्रुवारीत झाली अन् काही दिवसांतच कार्यकर्ते अडचणीत आले आहेत. निवडणुकीत पराभूत झालेल्यांनी परिसरातील ज्या कार्यकर्त्यांनी आपले काम न करता, प्रतिस्पर्धी उमेदवाराचे काम केले, त्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले आहे. काही ठिकाणी मारहाणीचे प्रकार घडू लागले आहेत, तर निवडणुकीनंतरची परिस्थिती कार्यकर्त्यांच्या जीवावर बेतणारी ठरू लागली आहे. खराळवाडी, गांधीनगर परिसरातील सुहास हळदणकर या कार्यकर्त्याचा सिमेंट ब्लॉक डोक्यात मारून खून झाला. निवडणुकीतील वातावरणच या खुनाच्या घटनेस कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर काही कार्यकर्त्यांनी प्रभागातील नागरी प्रश्नांवर आवाज उठविला होता. विद्यमान लोकप्रतिनिधी प्रभागातील विकासकामे करण्यास कमी पडले, हे जनतेला दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पिंपरी गाव, रहाटणी तसेच भोसरी परिसरात हाच का विकास? अशा प्रकारचे फलक झळकले होते. व्हॉट्सअ‍ॅपवर प्रभागातील विकासकामांच्या दर्जाबद्दल कमेंटस टाकल्या जात होत्या. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत प्रचारात सहभागी होणारे कार्यकर्ते निवडणुकीनंतर कोणाचे टार्गेट होत नाहीत. (प्रतिनिधी)असुरक्षित वातावरणकाही नगरसेवक संबंधित कार्यकर्त्यापुढे त्याने आपले काम न केल्याचे बोलून उघडपणे दाखवितात. तर काही जण सूडबुद्धीने वागणूक देतात. अशा कार्यकर्त्यांना धडा शिकवायचा असे ठरवून ते अन्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांच्यात कायम धूसपूस सुरू ठेवतात. त्याची परिणीती हाणामारित आणि खुनाच्या घटनांमध्ये दिसून येते.