पतीला जाळण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: August 18, 2016 06:33 IST2016-08-18T06:33:45+5:302016-08-18T06:33:45+5:30

घरखर्चासाठी पैसे मागितले, पतीने ते दिले नाहीत त्याचा राग आल्याने हिंजवडी, माण येथे पत्नीने पतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास

Trying to burn the husband | पतीला जाळण्याचा प्रयत्न

पतीला जाळण्याचा प्रयत्न

पिंपरी : घरखर्चासाठी पैसे मागितले, पतीने ते दिले नाहीत त्याचा राग आल्याने हिंजवडी, माण येथे पत्नीने पतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी मंगळवारी रात्री फिर्याद दाखल झाली आहे. अंगावर रॉकेल ओतून पेटविल्याने गंभीर भाजलेल्या पतीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीता डाडर (वय ३०) या महिलेने दादा कुंडलिक डाडर (वय ३५, दोघे रा. माण, हिंजवडी) यांच्यावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यामध्ये ते गंभीर भाजले आहेत. या घटनेमागील कारण किरकोळ असून घरखर्चाला पैसे दिले नाहीत, म्हणून पत्नीने या स्तराला जाऊन पतीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.

आरोपी नीता हिने कामाहून आलेल्या पतीकडे पैशाची मागणी केली; परंतु ‘सध्या पैसे नाहीत, पुढच्या आठवड्यात देतो’असे त्याने सांगितले. याचा राग आल्याने तिने हे कृत्य केले. तिच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप तिला अटक झालेली नाही. सहायक पोलीस निरीक्षक ए. डी. धस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Trying to burn the husband