शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिकेच्या 'या' ३ रुग्णालयांना राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र; मानांकन मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली महापालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 16:42 IST

या प्रमाणपत्रामुळे वैद्यकीय विभागाच्या गुणवत्तापूर्ण सेवांची राष्ट्रीय स्तरावर नोंद झाली असून, नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांच्या विश्वासार्हतेलाही अधिक बळ मिळाले आहे

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव, जिजामाता आणि नेहरूनगर या तीन शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानकांनुसार (एनक्यूएएस) राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे. हे मानांकन मिळवणारी पिंपरी-चिंचवड महापालिका ही महाराष्ट्रातील पहिली महापालिका ठरली आहे.

या प्रमाणपत्रामुळे वैद्यकीय विभागाच्या गुणवत्तापूर्ण सेवांची राष्ट्रीय स्तरावर नोंद झाली असून, नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांच्या विश्वासार्हतेलाही अधिक बळ मिळाले आहे. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (एनक्यूएएस) हे संक्रमण नियंत्रण, क्लिनिकल केअर, रुग्ण हक्क, रुग्णालय व्यवस्थापन व सेवा सुधारणा अशा महत्त्वपूर्ण निकषांवर आधारित असते. या सर्व निकषांची पूर्तता करत संबंधित केंद्रांनी आरोग्य सेवांच्या गुणवत्तेत आपला उच्च दर्जा सिद्ध केला आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोग्य सुविधा केंद्रांना हे यश मिळवून देण्यासाठी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरी नलवडे व शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक (सीक्यूएसी) डॉ. कोमल बनसोडे आणि संपूर्ण टीम यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. तसेच डॉ. छाया शिंदे आणि डॉ. शैलजा भावसार यांचेही विशेष सहकार्य लाभले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळालेले राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र हे वैद्यकीय विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित आहे. नागरिकांना उच्च दर्जाची, सुरक्षित आणि रुग्ण-केंद्रित सेवा देण्याचा आमचा संकल्प यामुळे अधिक दृढ झाला आहे. - डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri Corporation's Hospitals Achieve National Quality Certification: A First in Maharashtra

Web Summary : Pimpri Chinchwad Municipal Corporation's three urban primary health centers received national quality certification. The corporation is the first in Maharashtra to achieve this recognition, which validates its high-quality healthcare services and strengthens public trust.
टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhospitalहॉस्पिटलMunicipal Corporationनगर पालिकाHealthआरोग्यMONEYपैसा