उसने पैसे परत न केल्याने तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
By रोशन मोरे | Updated: August 17, 2023 11:58 IST2023-08-17T11:58:36+5:302023-08-17T11:58:55+5:30
हातउसने घेतलेले पैसे वारंवार मागणी करून देखील परत न देता पैसे देणाऱ्या तरुणालाच मानसिक त्रास दिला

उसने पैसे परत न केल्याने तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
पिंपरी : हातउसने घेतलेले पैसे वारंवार मागणी करून देखील परत दिले नाहीत. शिवाय पैसे देणाऱ्या तरुणालाच मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव सागर अप्पाराव वाघमारे (वय २६) असे आहे. ही घटना सोमवारी (दि.१४) सकाळी आठच्या सुमारास महादेवनगर कॉलनी, चक्रपाणी वसाहत रोड येथे घडली.
याप्रकरणी अमर अप्पासाहेब भुसारे (वय २३, रा.महादेवनगर कॉलनी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी शिवम बनवारी दास (रा. वडगावशेरी, शिवाजी उद्यान पुणे), सतीश ननावरे-पाटील (रा. धावडे वस्ती, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ सागर याच्याकडून आरोपींनी हातउसने पैसे घेतले होते. सागर याने वारंवार आरोपींकडे पैसे परत करण्याची मागणी केली होती. मात्र, पैसे परत न करता सागरला मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून सागर याने गळफास घेत आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद आहे.