मालकाने कोणतीही सुरक्षा साधने पुरवली नाहीत; कामगाराने गमावला जीव, चिखली येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 13:08 IST2026-02-27T13:08:07+5:302026-02-27T13:08:50+5:30

कंपनीत सुटे भाग बनवताना यंत्राचे भाग उडून कामगारांचा जीव जाऊ शकतो याची कल्पना असतानाही मालकाने कोणतीही सुरक्षा साधने पुरवली नव्हती

The employer did not provide any safety equipment the worker lost his life, incident in Chikhali | मालकाने कोणतीही सुरक्षा साधने पुरवली नाहीत; कामगाराने गमावला जीव, चिखली येथील घटना

मालकाने कोणतीही सुरक्षा साधने पुरवली नाहीत; कामगाराने गमावला जीव, चिखली येथील घटना

पिंपरी : कंपनीमध्ये काम करत असताना सुरक्षेच्या उपाययोजना न केल्यामुळे एका ४१ वर्षीय कामगाराला आपला जीव गमवावा लागला. ही घटना बुधवारी (दि. १८ फेब्रुवारी) दुपारी दोनच्या सुमारास चिखली येथील साने इंडस्ट्रीजमधील नवतेज प्रेसिंग अँड इंजिनिअरिंग कंपनीत घडली.

सुनील व्यंकट बडघे (वय ४१, रा. मोरे वस्ती, चिखली) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार अक्षय शिळीमकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कंपनी मालक अशोक जगन्नाथ वराडे (७०, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक वराडे यांची नवतेज प्रेसिंग अँड इंजिनिअरिंग नावाची चिखली येथे कंपनी आहे. त्यामध्ये वाहनांचे सुटे भाग बनवले जातात. हे सुटे भाग बनवताना यंत्राचे भाग उडून कामगारांचा जीव जाऊ शकतो याची कल्पना असतानाही मालकाने कोणतीही सुरक्षा साधने पुरवली नव्हती. यामुळे सुनील बडघे या कामगाराचा कामादरम्यान मृत्यू झाला.

Web Title : लापरवाही से गई जान: चिखली में सुरक्षा उपकरणों के बिना कामगार की मौत

Web Summary : चिखली की एक कंपनी में सुरक्षा उपायों की कमी के कारण 41 वर्षीय एक कामगार की मौत हो गई. सुनील बड़घे नवतेज प्रेसिंग एंड इंजीनियरिंग में काम करते समय मारे गए. पुलिस ने मालिक अशोक वराडे के खिलाफ लापरवाही का मामला दर्ज किया, जो मशीनरी के ज्ञात खतरों के बावजूद आवश्यक सुरक्षा उपकरण प्रदान करने में विफल रहे.

Web Title : Negligence Claims Life: Worker Dies Without Safety Gear in Chikhli

Web Summary : A 41-year-old worker died at a Chikhli company due to lack of safety measures. Sunil Badghe was killed while working at Navtej Pressing & Engineering. Police filed a case against owner Ashok Varade for negligence, failing to provide essential safety equipment despite the known dangers of the machinery.