शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

मानासाठी धनाचा विषय दप्तरी दाखल

By admin | Updated: August 30, 2016 01:38 IST

विधानसभा आणि लोकसभा सदस्यांना मानधन वाढीचा विषय मंजूर केल्यानंतर महापालिकेतील नगरसेवकांना पन्नास हजार रुपये मानधन मिळावे

पिंपरी : विधानसभा आणि लोकसभा सदस्यांना मानधन वाढीचा विषय मंजूर केल्यानंतर महापालिकेतील नगरसेवकांना पन्नास हजार रुपये मानधन मिळावे, हा विषय सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्यावर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या नगरसवेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मानधन वाढीच्या प्रश्नावरून बदनामी होऊ लागली आहे. बदनामी टाळण्यासाठी हा विषय सर्वसाधारण सभेने दप्तरी दाखल करून घेतला.सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर शकुंतला धराडे होत्या. आमदारांच्या मानधन वाढीचा विषय मंजूर झाल्यानंतर महापालिकेच्या विधी समितीनेही नगरसेवकांना पन्नास हजार रुपये प्रतिमहिना मानधन द्यावे, असा ठराव मंजूर केला होता. त्यावर शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. जनतेचे सेवक असणाऱ्यांना मानधन वाढ कशाला? अशा प्रकारचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. नगरसेवक, विरोधी पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी मानधन वाढीवर टीका केली होती. त्यानंतर आजच्या सर्वसाधारण सभेसमोर हा विषय आला असताना उपसूचनेसह मंजूर करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, या विषयावर बोलण्यास संजय काटे यांनी विनंती केली. सत्तारूढ राष्ट्रवादीच्या काटे यांनी मला मानधन वाढ नको, असे सांगून यापुढील काळातील माझे मानधन बंद करावे, अशी मागणी केली. त्यानंतर सुलभा उबाळे म्हणाल्या, ‘‘हा विषय विधीने मंजूर करताना गटनेत्यांशी चर्चा केली नाही. निवडणुकीच्या तोंडावर हीरोगिरी करण्याचा प्रयत्न यातून होणार आहे. ज्याला मानधन घ्यायचे, त्याला घेऊ द्यात. मानधन वाढीस आमचा विरोध आहे.’’सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘आपण नगरसेवक आहोत, याचे भान प्रत्येकाने ठेवायला हवे. हे मानधन आहे, पगार नाही, याचे भान हवे. आम्हाला वाढीव मानधन नको.’’ उल्हास शेट्टी म्हणाले, ‘‘मानधन वाढीच्या प्रश्नावरून नगरसेवकांची बदनामी होत आहे. नागरिक जाब विचारतात. त्या वेळी आपण कशाला नगरसेवक झालो, याबद्दल मान खाली घालावी लागते. अशा प्रकारचे विषय सभेसमोर येऊ नयेत. फेटाळून लावावेत.’’ वायसीएममध्ये महाविद्यालयपिंपरीतील वायसीएम रुग्णालयात पोस्ट ग्रॅज्युएट महाविद्यालय सुरू करावे असा ठराव तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी मांडला होता. या ठरावावर आज चर्चा झाली. या विषयी सदस्यांनी परदेशी यांचे अभिनंदन केले. महाविद्यालय सुरू करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठ सलग्निकरणाचा विषय मंजूर करण्यात आला. (प्रतिनिधी)