शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
3
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
4
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
5
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
6
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
7
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
8
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
9
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
10
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
11
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
12
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
13
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
14
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
15
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
16
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
17
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
18
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
19
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
20
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!

मागे एक अन् पुढे एक बसवायचं का? पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दुचाकीसाठी २ वेगळे नंबर, नागरिक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 13:47 IST

पुढील बाजूची नंबर प्लेट MH 14 BN 8927 तर मागील बाजूची दुसरी नंबर प्लेट एम एच 20 बी एन 8927 अशी आहे

महादेव मासाळ

पिंपळे गुरव : नागरिकांच्या गाड्यांचे चोरी  होण्याचे प्रमाण कमी व्हावे म्हणून राज्याच्या आरटीओ विभागाकडून एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याची नागरिकांना सक्ती केली आहे. त्यानुसार नागरिकांनी देखील ती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र पिंपरी चिंचवड विभागात एका व्यक्तीला एकाच गाडीसाठी दोन नंबर आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकारचाकारभार चव्हाट्यावर आलायचे पहायला मिळत आहे. या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

राज्य शासनाकडून नवीन नंबर प्लेट बसवण्याचे कॉन्टरेक्ट एका कंपनीला  देण्यात आले आहे. त्यामुळे ही संपूर्ण

प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. नंबर प्लेट रजिस्ट्रेशन करताना नागरिकांकडून संपूर्ण पैसे घेतले जात आहेत. अपॉइंमेंट नुसार नंबर प्लेट बसवून दिल्या जात आहेत. मात्र, पिंपरी चिंचवड मधील पिंपळे गुरव परिसरात राहत असलेले महेश आगम यांनी ऑनलाईन नंबर प्लेटसाठी रजिस्ट्रेशन केले होते. मात्र त्यांना संबंधित कंपनीकडून एकाच वाहनसाठी दोन नंबर प्लेट आल्या. त्यात पुढील बाजूची नंबर प्लेट MH 14 BN 8927 तर  मागील बाजूची दुसरी नंबर प्लेट  एम एच 20 बी एन 8927 अशी आहे.  त्यात आगम यांच्या दुचाकीचा MH 14 BN 8927 हा क्रमांक त्यांचा ओरिजनल असून मागे बसवण्यात येणारा क्रमांक हा चुकीचा आला आहे. त्यामुळे आगम यांनी  संताप व्यक्त करत आर टी ओ  प्रशासनाच्या च्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे. 

मला आलेले दोन्ही क्रमांक वेगळे असून हो संपूर्ण चूक राज्य सरकारची  असून त्यांनी ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. त्यांची ही चूक आहे.  ज्यावेळी मी आपइनमेंट नुसार नंबर प्लेट बसावायाला गेलो त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. संबंधित नंबर प्लेट बसवणाऱ्यांनी पुढच्या काही वेळात  नंबर प्लेट दुरुस्त करून बसवून देतो असे देखील सांगितले आहे. राज्य सरकारने ठेका दिलेल्या अशा कंपन्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून  अनेक ठिकाणी नंबर प्लेट बसवताना नागरिकांशी हुज्जत देखील घातली जात असल्याचे पहायला मिळत आहे. - महेश आगम, वाहनचालक ,पिंपळे गुरव

आरटीओ कार्यालयाकडून कधीच चुकीचा वाहन क्रमांक दिला जात नाही. या घटनेमध्ये नंबर प्लेट प्रिंट करणाऱ्या संबंधित कंपनीची कदाचित ही चूक असेल.नंबर प्लेट पॅकेजिंग करताना संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून नजरचुकीने हे झाले असू शकते. सदर वाहनचालकाने  संबंधित कंपनीला याविषयी माहिती दिल्यास  नंबर प्लेट बदलून मिळेल. - राहुल जाधव, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड 

टॅग्स :PuneपुणेbikeबाईकcarकारRto officeआरटीओ ऑफीसtraffic policeवाहतूक पोलीस