शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांनी नाकारला शिवसेनेचा अधिकार

By admin | Updated: October 27, 2015 01:02 IST

महापालिकेच्या मॉडेल वॉर्डामध्ये विभागवार केलेली कामे, प्रस्तावित कामांचे अंदाजपत्रक मंजूर प्रस्ताव, मॉडेल वॉर्डात कोणते वॉर्ड घेतले

पिंपरी : महापालिकेच्या मॉडेल वॉर्डामध्ये विभागवार केलेली कामे, प्रस्तावित कामांचे अंदाजपत्रक मंजूर प्रस्ताव, मॉडेल वॉर्डात कोणते वॉर्ड घेतले, त्याकरिता बजेट तरतूद किती, मनपा क्षेत्रातील एलईडी आणि सीसीटीव्ही बसविण्याचे धोरण काय, याबाबत येत्या २० नोव्हेंबरच्या सभेत शिवसेनेच्या वतीने प्रश्नोत्तरे विचारण्यासाठी महापौरांना पत्र दिले. महापौरांनी पत्र आणि प्रश्न विचारण्याचा सदस्यांचा अधिकार नाकारला असल्याबद्दल शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या वतीने महापौरांना नोटीस देण्यात येणार आहे.महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. पाशवी बहुमताच्या जोरावर विविध विषय चर्चेविनाच रेटून नेले जातात. तसेच सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांचे विषय टाळले जातात. महत्त्व दिले जात नाही. शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांनी महापौर शकुंतला धराडे यांच्या नावाने पत्र तयार केले. येत्या सभेमध्ये प्रश्नोत्तरांसाठी संधी मिळावी, अशी मागणी करणारे पत्र घेऊन उबाळे महापौरांच्या कक्षात गेल्या. पत्र वाचून पाहिल्यानंतर महापौरांनी आपल्या सहायकामार्फत सत्तारूढ पक्षनेत्यांच्या कक्षात पाठविले. काही मिनिटांनंतर महापौरांचा सहायक परत आला आणि त्याने तार्इंचा निरोप महापौरांना सांगितला. प्रश्नोत्तराचे पत्र स्वीकारू शकत नाही, अशी भूमिका महापौरांनी घेतली. त्यानंतर उबाळे यांनी महापौर ज्यांचे ऐकतात, ज्यांनी संधी दिली, त्यांना दूरध्वनी केला. मात्र, महापौरांनी भूमिका सोडली नाही. त्यानंतर उबाळे यांनी हे पत्र कार्यालयीन आवक-जावकमध्ये नोंदविले. याविषयी महापौरांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)