'लाल लाल कलरची बांगडी', बाजारात खरेदीही रांगडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 16:58 IST2026-05-12T16:57:39+5:302026-05-12T16:58:16+5:30
सोशल मीडियावर सध्या 'लाल लाल कलरची बांगडी' या मराठी गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला

'लाल लाल कलरची बांगडी', बाजारात खरेदीही रांगडी
- प्रशांत होनमाने
पिंपरी : सोशल मीडियावर सध्या 'लाल लाल कलरची बांगडी' या मराठी गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, बाजारात लाल रंगाच्या बांगड्यांची मागणी अचानक वाढली आहे. तरुणी आणि महिलांकडून मोठ्या प्रमाणावर लाल बांगड्या खरेदी केल्या जात असल्याने दुकानांमध्ये या बांगड्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
'गुलाबी साडी' फेम गायक संजू राठोड याचे हे नवे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आले. अवघ्या २४ तासांत लाखोंच्या व्ह्यूज मिळाल्यानंतर हे गाणे तरुणाईच्या प्ले-लिस्टमध्ये अग्रस्थानी पोहोचले आहे. इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्ट्स आणि डान्स कव्हर्समध्ये या गाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. विशेष म्हणजे, या गाण्यात अभिनेत्री ईशा मालवीय हिचा सहभाग आहे.
तिच्या स्टाइलमुळे तरुणींमध्ये लाल बांगड्यांची फॅशन पुन्हा चर्चेत आली आहे. गाण्यातील डान्स स्टेप्स, आकर्षक संगीत आणि ग्रामीण ढंगामुळे अनेकजणी रील्स तयार करताना लाल बांगड्यांचा वापर करत आहेत. परिणामी, दुकानांमध्ये लाल रंगाच्या बांगड्यांची मागणी आहे. दुकानदारांच्या मते, गेल्या काही दिवसांत लाल बांगड्यांची विक्री वाढली आहे. विशेषतः कॉलेज तरुणी आणि सोशल मीडिया कंटेंट तयार करणाऱ्यांकडून मागणी जास्त आहे.
परिणामी, लाल बांगड्यांची फॅशन पुन्हा चर्चेत आली आहे. गाण्यातील डान्स स्टेप्स, आकर्षक संगीत आणि ग्रामीण ढंगामुळे अनेकजणी रील्स तयार करताना लाल बांगड्यांचा वापर करत आहेत. दुकानांमध्ये लाल रंगाच्या बांगड्यांची मागणी आहे. दुकानदारांच्या मते, गेल्या काही दिवसांत लाल बांगड्यांची विक्री वाढली आहे. विशेषतः कॉलेज तरुणी आणि सोशल मीडिया कंटेंट तयार करणाऱ्यांकडून मागणी जास्त आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम, लग्नातही पसंती
लग्नसमारंभ, कॉलेज फेस्ट, डीजे नाइट्स आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हे गाणे सध्या मोठ्या उत्साहात वाजवले जात आहे. सोशल मीडियावर अनेक इन्फ्लुएन्सर्स आणि डान्सर्स या गाण्यावर व्हिडीओ तयार करत असून, लाल बांगडीचा ट्रेंड वाढत आहे.
गेल्या काही दिवसांत लाल बांगड्यांची मागणी वाढली आहे. विशेषतः कॉलेज तरुणी आणि रील्स बनवणाऱ्या मुलींकडून लाल रंगाच्या बांगड्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. लोकप्रिय डिझाइन तर लगेच संपल्याने ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. - फरहान पटवेकरी, बांगडी विक्रेता.