शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

Pune plastic price hike : प्लास्टिक महागले, सारेच होरपळले; दूध वितरकही दरवाढीत कोलमडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 13:38 IST

- आखातातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतवाढीचा बसतोय तडाखा, पिशव्यांच्या दरात साठ टक्के वाढ; प्लास्टिकला स्वस्त आणि प्रभावी पर्याय नसल्याचा परिणाम  

- आकाश झगडे

पिंपरी : आखातातील युद्ध आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीचा तडाखा आता जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा साखळीला बसू लागला आहे. प्रामुख्याने पॅकेजिंग आणि इतर व्यावसायिक कारणांसाठी अनिवार्य असलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या दरात गेल्या काही दिवसांत दुपटीने वाढ झाली आहे. प्लास्टिकला कोणताही स्वस्त आणि प्रभावी पर्याय उपलब्ध नसल्याने, ही दरवाढ व्यवसायाचे कंबरडे मोडणारी ठरत आहे.महाराष्ट्र सरकारने पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घातली असली तरी, दूध, औषधे आणि उत्पादनाच्या ठिकाणी पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिकला विशिष्ट अटींनुसार सवलत दिली आहे; मात्र, सध्या कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे या सर्व क्षेत्रांच्या खर्चात मोठी वाढ झाली असल्याचे व्यवसासिक सांगतात.

अनिवार्य प्लास्टिक पिशव्यांचा वापर कोठे होतो ?

दूध, दुग्धजन्य पदार्थ अन्न प्रक्रिया, पॅकेजिंग वैद्यकीय, औषध निर्माण बायो-मेडिकल वेस्ट कृषी, नर्सरी, खते-बियाणे ई-कॉमर्स, कुरिअर हॉटेल, केटरिंग, औद्योगिक उत्पादने

प्लास्टिक पिशव्या महागण्याची मुख्य कारणे

प्लास्टिकच्या पिशव्या प्रामुख्याने कच्च्या तेलाच्या उपउत्पादनांपासून तयार केल्या जातात. आंतरराष्ट्रीय तणावामुळे प्लास्टिक ग्रॅन्युअल्स तयार करणाऱ्या कंपन्यांना कच्च्या मालाची टंचाई जाणवत आहे. प्लास्टिक रोलचा दर ऐंशी टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यातच व्यावसायिक गॅस आणि वीज महागल्याने उत्पादन खर्च वाढला आहे.पर्यायांचा अभाव आणि प्रशासकीय उदासीनता

दुधासारख्या जीवनावश्यक वस्तूंसाठी प्लास्टिक पिशव्यांना सध्यातरी कोणताही स्वस्त आणि टिकाऊ पर्याय उपलब्ध नाही. काचेच्या बाटल्या किंवा पेपर कार्टन्सचा खर्च प्लास्टिकच्या तुलनेत खूप जास्त आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांमुळे जाड प्लास्टिक वापरणे बंधनकारक आहे. 

पॅकेजिंग मटेरियलमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. प्लास्टिक आणि इंधन दरवाढीमुळे आमचा नफा संपला आहे. सरकारने पॅकेजिंग मटेरियलवरील कर कमी करावा किंवा दूध दरात त्या प्रमाणात सुधारणा करावी, अन्यथा दूध वितरण करणे कठीण होईल. - विठ्ठल मोरे, दुग्ध वितरक व व्यावसायिक  

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Plastic Price Hike: Costs Soar, Milk Distributors Struggle with Inflation

Web Summary : Plastic price doubles due to rising crude oil costs, impacting essential packaging. Milk distributors face challenges, urging tax cuts or price revisions amid rising expenses for mandatory packaging.
टॅग्स :PuneपुणेLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड