जाधववाडी : शहरात महिनाभरापासून ४० ते ४१ अंश तापमानामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र, दोन दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. मात्र, हवेत वाढलेल्या दमटपणामुळे उकाड्याची धग कायम आहे.
सकाळपासूनच आकाश ढगाळ असल्याने ३७ ते ३८ अंश तापमान आहे. दुपारच्या वेळेत उन्हाचा तडाखा तुलनेने कमी जाणवत आहे. मात्र, वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने हवेत प्रचंड उकाडा जाणवत आहे. परिणामी घामाच्या धारा लागून अस्वस्थता वाढत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना दमट हवेमुळे त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी नागरिक थंड पेये, उसाचा रस, लिंबू सरबत, नारळपाणी यांचा आधार घेत आहेत.
पावसाची शक्यता, पण...
ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली असली, तरी अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही. हवामानात सतत बदल होत असल्याने आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. डॉक्टरांच्या मते, अशा दमट आणि उष्ण वातावरणात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये यासाठी पुरेसे पाणी पिणे, हलका आहार घेणे आणि उन्हात अनावश्यक बाहेर पडणे टाळणे गरजेचे आहे. उकाड्याच्या धगीमुळे पिंपरी-चिंचवडकर अजूनही त्रस्त आहेत.
Web Summary : Cloudy weather offers slight heat relief, but high humidity persists. Temperatures are lower, yet residents grapple with oppressive stickiness, causing discomfort. Doctors advise hydration and avoiding unnecessary sun exposure. Pimpri-Chinchwad residents remain troubled by the humid heat.
Web Summary : बादलों के कारण गर्मी से थोड़ी राहत मिली है, लेकिन उमस अभी भी बनी हुई है। तापमान कम है, फिर भी निवासी चिपचिपी गर्मी से परेशान हैं, जिससे असुविधा हो रही है। डॉक्टरों ने जलयोजन और अनावश्यक धूप से बचने की सलाह दी है। पिंपरी-चिंचवड के निवासी अभी भी उमस भरी गर्मी से त्रस्त हैं।