Angkrish Raghuvanshi IPL Record : आयपीएलच्या यंदाचा हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातून मैदानात उतरणाऱ्या मुंबईकर युवा स्टार बॅटर अंगकृष रघुवंशीसाठी खास राहिला आहे. ईडन गार्डन्सच्या ऐतिहासिक मैदानात गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात त्याने तुफान फटकेबाजीसह आणखी एक धमाकेदार शो दाखवून दिला. यंदाच्या हंगामातील पाचवे अर्धशतक झळकावताना त्याने कोलकाता संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा या दिग्गजांच्या खास एलिट क्लबमध्ये एन्ट्री मारली आहे. एवढेच नव्हे तर रिषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल या स्टार खेळाडूंचा मोठा विक्रमही त्याला खुणावत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रघुवंशीचा धमाकेदार शो
रघुवंशीनं कोलकाताच्या संघाकडून आपल्या कामगिरीतील सातत्य कायम राखत गुजरात टायटन्सविरुद्ध ८२ धावांची नाबाद खेळी केली. ४४ चेंडूंचा सामना करताना रघुवंशीने ४ चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर KKR च्या संघाने २ विकेट्सच्या मोबदल्यात निर्धारित २० षटकात २४७ धावा केल्या. या खेळीसह एका हंगामात पाच किंवा त्यापेक्षा अधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारा रघुवंशी कोलकाताचा तिसरा फलंदाज ठरला. याआधी गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांनी ही कामगिरी करून दाखवली होती.
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजनं 'अरेस्ट'च नाही केलं; मग फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
गंभीर-उथप्पानंतर अशी कामगिरी करणारा तिसरा बॅटर ठरला रघुवंशी
कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला २०१२ आणि २०१४ च्या हंगामात जेतेपद पटकावून देणाऱ्या गौतम गंभीर याने २०१२ च्या हंगामात ६ वेळा तर २०१६ च्या हंगामात ५ वेळा फिफ्टी प्लसचा डाव साधला होता. रॉबिन उथप्पाने २०१६ आणि २०१७ च्या हंगामात प्रत्येकी ५ - ५वेळा ही कामगिरी करून दाखवली होती. आता या यादीत युवा रघुवंशीचा समावेश झाला आहे.
रिषभ पंत आणि यशस्वी जैस्वालला मागे टाकण्याची संधी
आयपीएलमध्ये वयाच्या २१ व्या वर्षी सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रिषभ पंत (२०१८) आणि यशश्वी जैस्वाल (२०२३ ) संयुक्तरित्या अव्वलस्थानी आहेत. त्यांनी ६ वेळा ही कामगिरी करून दाखली होती. अंगकृष रघुवंशी याने आरसीबीचा स्टार देवदत्त पडिक्कल याची बरोबरी केली आहे. त्याने २०२० च्या हंगामात ५ वेळा हा डाव साधला होता. केकेआरचा संघ यंदाच्या हंगामात आणखी दोन सामने खेळणार असून कामगिरीतील सातत्य कायम ठेवून रघुवंशीला दोन दमदार खेळीसह पंत आणि जैस्वाल यांना मागे टाकण्याची संधी आहे.
Web Summary : Angkrish Raghuvanshi's explosive innings against GT at Eden Gardens marked his entry into KKR's elite club alongside legends like Gautam Gambhir and Robin Uthappa. His unbeaten 82, featuring 4 fours and 7 sixes, puts him close to surpassing records held by Rishabh Pant and Yashasvi Jaiswal.
Web Summary : ईडन गार्डन्स में जीटी के खिलाफ अंगकृष रघुवंशी की विस्फोटक पारी ने उन्हें गौतम गंभीर और रॉबिन उथप्पा जैसे दिग्गजों के साथ केकेआर के एलिट क्लब में प्रवेश दिलाया। उनके नाबाद 82 रनों में 4 चौके और 7 छक्के शामिल थे, जो उन्हें ऋषभ पंत और यशस्वी जायसवाल के रिकॉर्ड को पार करने के करीब ले जाते हैं।