1 / 5सुट्टीच्या आदल्या रात्री झोप लागत नाही, हा आपल्यापैकी बहुतेकांचा अनुभव आहे. यामागे केवळ आपल्या भावनाच नाही, तर सायकॉलॉजिकल आणि न्युरोलॉजिकल कारणं आहेत.2 / 5आठवडाभर ऑफिस, अभ्यास किंवा कामाच्या व्यापामुळे आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे सुट्टीच्या आदल्या रात्री आपल्याला असं वाटतं की, 'उद्या सुट्टी आहे, मग कितीही वाजेपर्यंत जागे राहिलो तरी काही हरकत नाही आणि उशीरा उठलो तरी काही प्रॉब्लेम नाही.3 / 5उद्या सुट्टी आहे आणि आवडीच्या गोष्टी करायला मिळणार आहेत, या विचारानेच मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं आनंदाचं संप्रेरक रिलीज होतं. हा डोपामाइन रश मेंदूला शांत करण्याऐवजी जास्त हायपर किंवा उत्तेजित करतो. मेंदू उत्तेजित अवस्थेत असल्यामुळे शरीराला आता झोपण्याची वेळ झाली आहे, हा मॅसेज मिळतच नाही.4 / 5रोज रात्री आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे' हा एक अदृश्य दबाव असतो. त्यामुळे मेंदू शरीराला थकवा जाणवून देऊन झोपायला भाग पाडतो. पण सुट्टीच्या आदल्या रात्री उद्या सकाळी अलार्म लावण्याची गरज नाही, हवं तितकं उशिरा उठू शकतो, ही निश्चिंतता असते. हा दबाव अचानक निघून गेल्यामुळे शरीर खूप रिलॅक्स होतं आणि झोपण्याची घाई करत नाही.5 / 5आपल्या शरीराचे एक जैविक घड्याळ असते, ज्याला सर्कॅडियन रिदम म्हणतात. रोज एका ठराविक वेळी झोपण्यामुळे मेंदूला त्याची सवय झालेली असते. पण सुट्टीच्या रात्री आपण हा पॅटर्न मुद्दाम मोडतो. वीकेंडला झोपण्याची वेळ बदलल्यामुळे शरीराचे हे घड्याळ बिघडते, ज्याला विज्ञानात 'सोशल जेटलॅग' म्हणतात.