शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या जगण्याचा आधार हिरावला...? चिमुरड्याचा मृतदेह पाहताच आईने फोडला हंबरडा

By नारायण बडगुजर | Updated: May 3, 2026 11:50 IST

‘आमच्या जगण्याचा आधार हिरावला, आता आम्ही कोणासाठी जगू,’ असे म्हणत तिने हंबरडा फोडला. त्यामुळे पोलिसांसह कामगार चाळ गलबलून गेली.

पिंपरी : पोलिसांनी कुलूप तोडून खोलीतील सुटकेस उघडली. त्यात तीनवर्षीय चिमुरड्याचा मृतदेह आढळला. दुपारपासून चिमुरड्याच्या शोधात असलेल्या आईची तगमग वाढली होती. आपल्या निरागस चिमुरड्याचा मृतदेह पाहताच तिच्या संयमाचा अंत झाला. ‘आमच्या जगण्याचा आधार हिरावला, आता आम्ही कोणासाठी जगू,’ असे म्हणत तिने हंबरडा फोडला. त्यामुळे पोलिसांसह कामगार चाळ गलबलून गेली.

मध्यप्रदेशातील रेवा जिल्ह्यातील असलेल्या तीनवर्षीय चिमुरड्याचे कुटुंब काही वर्षांपूर्वी रोजगारानिमित्त सुरत येथे गेले होते. तेथे चिमुरड्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर चिमुरड्यासह त्याच्या सहावर्षीय बहिणीला घेऊन त्याची आई खालुंब्रे येथे सहा महिन्यांपूर्वी राहण्यास आली. रोजंदारीवर काम करून दोन मुलांसह ती उदरनिर्वाह करीत होती. दरम्यान, त्यांच्या शेजारील चाळीमध्ये बिहार येथील एक १६ वर्षीय मुलगा राहण्यासाठी आला होता. तो देखील रोजंदारीवर काम करत होता.

पतीच्या निधनानंतर एकटी पडलेली असतानाही तिने हिम्मत सोडली नव्हती. सहावर्षीय मुलगी आणि तीनवर्षीय चिमुरड्याचे पालनपोषण करण्यासाठी तिची धडपड सुरू झाली. त्यासाठी ती गुजरातमूधन चाकण एमआयडीसीत आली. कामगार दिनानिमित्त सुट्टीचा दिवस म्हणून घरातील कपडे, भांडी धुऊन इतर कामे करण्याची तिची लगबग सुरू होती. त्याच वेळी खेळण्यासाठी बाहेर गेलेला चिमुरडा बराच वेळ होऊनही परतला नाही, म्हणून तिने शोध सुरू केला. तिची तगमग वाढत होती. रात्री साडेनऊच्या सुमारास चिमुरड्याला मृतावस्थेत पाहून तिच्या भावना अनावर झाल्या.

नशा करून गुन्हेगारी कृत्य?

संशयित अल्पवयीन मुलगा १५ दिवसांपासून एका कंपनीत रोजंदारीवर कामाला जात होता. तो मोबाइल फोन वापरत नसल्याचे समोर आले आहे. कामानिमित्त १२ ते १३ तास बाहेर असल्याने त्याच्याशी जास्त कोणी संपर्कातही नव्हते. मात्र, तो नशा करत असल्याचे काही जणांनी पोलिसांना सांगितले. त्याची वैद्यकीय चाचणी केली आहे. त्याने नशेत हे कृत्य केले आहे का, याबाबतही दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mother's world shattered: Son found dead, her support gone.

Web Summary : A three-year-old boy was found dead in a suitcase, leaving his mother devastated. The family, originally from Madhya Pradesh, had moved for work. A 16-year-old neighbor is suspected, with police investigating possible intoxication as a motive. The mother's cries echoed through the labor colony.
टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या