वीज यंत्रणा बंद केल्याचा जाब विचारल्याने डॉक्टरला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 12:49 IST2026-04-25T12:48:54+5:302026-04-25T12:49:18+5:30
- हॉस्पिटल जवळ असलेल्या डीपी मधील इलेक्ट्रिक वायर एका टँकरच्या धडकेत तुटल्या. यामुळे हॉस्पिटल मधील वीजपुरवठा खंडित झाला.

वीज यंत्रणा बंद केल्याचा जाब विचारल्याने डॉक्टरला मारहाण
पिंपरी : हॉस्पिटल परिसरात विजेच्या तारा तुटल्याने हॉस्पिटल मधील वीजपुरवठा बंद झाला. त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या डॉक्टरला चौघांनी मिळून मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि २३ एप्रिल) दुपारी बारा वाजताच्या सुमारास निघोजे येथे घडली.
दक्षिण महाळुंगे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन चिमाजी शिंदे (३६, निघोजे, खेड) यांनी याप्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश येळवंडे, कैलास फाफाळे, संदीप हुलावळे आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचे निघोजे येथे श्री लक्ष्मी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल जवळ असलेल्या डीपी मधील इलेक्ट्रिक वायर एका टँकरच्या धडकेत तुटल्या. यामुळे हॉस्पिटल मधील वीजपुरवठा खंडित झाला. हा टँकर संशयितांनी बोलावला असल्याने फिर्यादी यांनी संशयितांकडे जाब विचारला. या कारणावरून संशयितांनी फिर्यादी यांना बेदम मारहाण केली.