शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

पिंपरीत वाहनचोरीचे सत्र सुरूच; चोरट्यांनी महामार्गावरून पळविली पार्क केलेली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2020 2:51 PM

अज्ञात चोरट्यांनी त्यांची साडेचार लाख रुपये किमतीची बस चोरून नेली..

ठळक मुद्देअवजड वाहनांचे मालक धास्तावले

पिंपरी : वाहनचोरीच्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळल्या असल्या तरी, वाहनचोरीचे प्रकार रोखण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. दुचाकी, चारचाकी वाहनांची सर्रास चोरी होत असतानाच वाहनचोरट्यांनी अवजड वाहनांकडे देखील मोर्चा वळविला आहे. पिंपरी येथे महामार्गावर पार्क केलेली बस चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

अजमेर राजमहंमद पटेल (वय ३५, रा. कासारवाडी) यांनी याबाबत रविवारी (दि. ८) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी खासगी बसचे चालक आहेत. फिर्यादी यांनी २९ ऑक्टोबरला रात्री साडेआठच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथील शेल पेट्रोल पंपावर बस लॉक करून पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची साडेचार लाख रुपये किमतीची बस चोरून नेली. हा प्रकार ३० ऑक्टोबर रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास उघडकीस आला.

अवजड वाहनधारक धास्तावलेवाहनचोरीच्या घटना वाढत असतानाच अवजड वाहने चोरून नेल्याचे प्रकार देखील घडत आहेत. त्यामुळे अजवड वाहनांचे मालक धास्तावले आहेत. अवजड वाहने रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेत पार्क केली जातात. ही वाहने काेठेही घेऊन जाणे सहज शक्य होत नाही. मात्र चोरटे अशा वाहनांचीही चोरी करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtheftचोरीThiefचोरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी