‘त्या’ क्षणी नेमकं काय घडलं ? पिंपरीत ८व्या मजल्यावरून पडून ३४ वर्षीय महिलेचा मृत्यू

By नारायण बडगुजर | Updated: May 10, 2026 19:09 IST2026-05-10T19:08:43+5:302026-05-10T19:09:09+5:30

- तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

pimpri chinchwad crime news what exactly happened at that moment a34-year-old woman died after falling from the 8th floor in Pimpri | ‘त्या’ क्षणी नेमकं काय घडलं ? पिंपरीत ८व्या मजल्यावरून पडून ३४ वर्षीय महिलेचा मृत्यू

‘त्या’ क्षणी नेमकं काय घडलं ? पिंपरीत ८व्या मजल्यावरून पडून ३४ वर्षीय महिलेचा मृत्यू

पिंपरी : इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून एका महिलेचा मृत्यू झाला. मावळ तालुक्यातील कातवी येथील व्हीटीपी अर्बन लाइफ सोसायटीत शनिवारी (दि. ९ मे) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.


प्रतिभा मनीष शंकर (वय ३४, रा. व्हीटीपी अर्बन लाइफ सोसायटी, कातवी, ता. मावळ जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तळेगाव एमआयडीस पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभा शंकर या राहत्या घराच्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. प्रथमदर्शही हा आत्महत्येचा प्रकार असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Web Title : पिंपरी में 8वीं मंजिल से गिरने से 34 वर्षीय महिला की मौत

Web Summary : पिंपरी में वीटीपी अर्बन लाइफ सोसाइटी में एक 34 वर्षीय महिला, प्रतिभा शंकर, इमारत की आठवीं मंजिल से गिरने के बाद मर गई। पुलिस को आत्महत्या का संदेह है; जांच जारी है।

Web Title : Woman, 34, Dies After Fall From 8th Floor in Pimpri

Web Summary : A 34-year-old woman, Pratibha Shankar, died after falling from the eighth floor of a building in Pimpri. The incident occurred at VTP Urban Life Society in Katavi. Police suspect possible suicide; investigation is ongoing.