पिंपरी : आंद्रा धरण परिसरात जॅकवेल उभारण्यासाठी जलसंपदा विभागाने महापालिकेस ९५ गुंठे जागा देण्याचे मान्य केले आहे. त्यासाठी महापालिका जलसंपदा विभागास ३ कोटी ३ लाख रुपये देणार आहे. त्यामुळे जागेचा मुख्य प्रश्न सुटल्याने जॅकवेलसह भूमिगत जलवाहिनीचे कामाची निविदा लवकरच काढण्यात येणार आहे. जॅकवेलमुळे महापालिकेची दरवर्षी पावणेदोन कोटी रुपयांची बचत होणार आहे.
महापालिकेस आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी राखीव आहे. मात्र, प्रकल्प पूर्ण होईपर्यंत तळवडेजवळील निघोजे येथील इंद्रायणी नदी बंधाऱ्यावर तात्पुरत्या स्वरूपात ९५ एमएलडी पाणी उचलत आहे.
जलशुद्धीकरणाचा खर्च वाढला
इंद्रायणी नदीकाठावरील गावांचे मैलासांडपाणी थेट नदीत सोडले जात आहेत. तसेच, उद्योगांचे रासायनिक सांडपाणीही थेट नदीत मिसळत आहे. त्यामुळे नदीचे पाणी अधिक दूषित आहे. त्या पाण्यावर चिखली येथील जलशुद्धीकरणे केंद्रात प्रक्रिया केली जाते. अतिदूषित पाणी असल्याने ते शुद्ध करण्यासाठी महापालिकेत अधिकचा खर्च येत आहे.
थेट पाणी उचलणार
आंद्रा धरणातून पाणी उचलण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. जॅकवेलसाठी जागेची मागणी केली होती. धरणाच्या वरील बाजूस जागा मिळाली आहे. जागा ताब्यात येताच, पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जॅकवेल तसेच भूमिगत जलवाहिनीची निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. जॅकवेलमुळे महापालिकेची दरवर्षी पावणेदोन कोटी रुपयांची बचत होणार आहे.
..असे होणार काम
धरणापासून तळेगाव एमआयडीतील नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टँकपर्यंत १७०० मिलिमीटर व्यासाची भूमिगत जलवाहिनी टाकली जाणार आहे. हे अंतर नऊ किलोमीटर आहे. ते काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराला स्वच्छ शंभर एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे.
जलसंपदा विभागाने विभागाने आंद्रा धरणाच्या वरील बाजूस जागा मंजूर केली आहे. तिथे जॅकवेल उभारण्यात येणार आहे. तेथून नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टँकपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्या दोन्ही कामाची निविदा तयार आहे. लवकरच निविदा प्रसिद्ध करण्यात येईल. - प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, महापालिका
Web Summary : जलसंपदा विभागाने पिंपरी-चिंचवडच्या जॅकवेलसाठी आंद्रा धरणाजवळ जमीन मंजूर केली, ज्यामुळे वार्षिक कोटींची बचत होईल. महामंडळ शहराला स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी भूमिगत पाईपलाईन तयार करेल, ज्यामुळे शुद्धीकरण खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. लवकरच कामाला सुरुवात होईल.
Web Summary : जल संसाधन विभाग ने पिंपरी-चिंचवड के जैकवेल के लिए आंद्रा बांध के पास जमीन को मंजूरी दी, जिससे सालाना करोड़ों की बचत होगी। निगम शहर को स्वच्छ पानी की आपूर्ति के लिए एक भूमिगत पाइपलाइन का निर्माण करेगा, जिससे शुद्धिकरण लागत में काफी कमी आएगी। जल्द ही काम शुरू होगा।