मनीषा म्हात्रे मुंबई : एपीके फाइलचे जाळे देशभर पसरवून त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी (पश्चिम विभाग) पर्दाफाश केल्यानंतर, त्यांचे देशभरातील सर्व्हरच बुधवारी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे एक मोठी साखळी उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले. दहावी नापास असले, तरी आरोपींनी २५० हून अधिक वेगवगेळ्या प्रकारे फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे.
आरिफ अन्सारी (२८), मेहबूब आलम (२६) आणि बिलाल शेख (२८) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सायबरचे तपास अधिकारी डॉ. नितीन गच्छे, विजयकुमार घोरपडे, धनवेश पाटील, राजेश खुशलानी आणि पोलिस अंमलदार सचिन सावंत, संग्राम जाधव व विकास दिघे या पथकाने ही कामगिरी केली. आरिफ अन्सारी हा दहावी नापास, तर मेहबूब आणि बिलाल हे आठवी पास आहे. २०२४ जामतारामध्ये स्थानिक पोलिसांनी एपीके फाइल फसवणूक प्रकरणात या तिघांना अटक झाली होती. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात ते जामिनावर बाहेर आले. त्यानंतर इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फायदा घेत गॅसच्या नावे विविध एपीके फाइल विक्रीचे जाळे वाढवले. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने झारखंड कनेक्शन शोधले. पुढे, सीडीआरच्या मदतीने तिघेही पत्नीसह पिकनिकवरून गंगटोकवरून परतत असताना पथकाने त्यांना चालत्या शताब्दी एक्सप्रेसमधून फिल्मी स्टाइलने अटक केली.
या नावाच्या एपीके फाइलचा वापरआरटीओ ई-चालान, विविध बँक, ग्राहक सेवा, महावितरण, पीएम किसन योजना, जल वितरण, पीएनबी, टाटा पॉवरसह २५० अधिक नावांनी एपीके फाइल तयार करून त्याची विक्री केल्याची माहिती तपासात समोर येत आहे. पुढे म्यूल अकाउंटद्वारे पैसे स्वीकारून त्यांचा व्यवहार चालायचा. त्यांच्या आतापर्यंतच्या बँक स्टेटमेंटमधून ४० ते ५० लाख तीन बँक खात्यांत मिळून आले आहेत.
मुंबईतील फसवणुकीच्या २०० गुन्ह्यात सहभाग उघडआरोपींनी एपीके फाइलचे सर्व्हर तयार केले होते. त्यानुसार, एपीके फाइल खरेदी करणाऱ्याचे जाळे देशभरात चालायचे. पोलिसांच्या हाती हे सर्व्हर लागल्यानंतर ते बुधवारी पूर्णतः बंद करण्यात त्यांना यश आले. त्यामुळे एपीकेची अन्य साखळीही उद्ध्वस्त झाली असून, फसवणुकीचा आकडाही खाली येण्यास सुरुवात झाली. मुंबईत ३०० हून अधिक एपीके फाइल संबंधित फसवणुकीच्या गुन्ह्यांपैकी २०० हून अधिक गुन्ह्यांत त्यांचा सहभाग असल्याचे समोर येत आहे. तर राज्यात हाच आकडा हजारोंच्या घरात असण्याची शक्यता आहे.
२०२१ पासून कार्यरतदेशभर २०२१ पासून एपीके फाइलचे जाळे पसरले. तेव्हापासून ही टोळी कार्यरत होती. तेव्हाही एका प्रकरणात आरिफचे नाव एका गुन्ह्याच्या सीडीआरमध्ये समोर आले, असेही समोर येत आहे.
थेट वेबसाइट थाटून १०-१५ हजारांत विक्रीआरिफसह त्याच्या साथीदारांनी एक वेबसाइट तयार केली होती. त्या वेबसाइटवरून भामट्यांना हव्या त्या संस्थेशी संबंधित एपीके फाइल तयार करून ते देत होते. या सर्व गोष्टी डार्कवेबमार्फतच चालायचे. ही टोळी सुरुवातीला ५ ते ७ हजारांत एपीके फाइलची विक्री करायचे. सध्या १० ते १५ हजारांत एक फाइल विकायचे. काही प्रकरणांत ३० ते ४० हजारांत देखील फाइल विक्री केल्याचे तपासात समोर आले.
आरिफने केली हॅकिंगच्या क्लासमध्ये एन्ट्री आरिफ अन्सारीने डार्क नेटवरून ऑनलाइन हॅकिंगसाठीही नोंदणी केल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. डार्कवेबवरूनच त्याने एपीके फाइलची माहिती मिळवत ते तयार करण्याचे टूल्स मागवले होते. पुढे त्या सॉफ्टवेअर टूल्सच्या मदतीने ते सायबर भामट्यांना एपीके फाइलची विक्री करत होते.
Web Summary : Mumbai Police busted a nationwide APK file scam, shutting down servers. Three, including a tenth-grade dropout mastermind, were arrested for creating and selling fraudulent files disguised as various services, amassing lakhs through mule accounts. They are linked to over 200 Mumbai fraud cases.
Web Summary : मुंबई पुलिस ने अखिल भारतीय एपीके फ़ाइल घोटाले का भंडाफोड़ किया, सर्वर बंद कर दिए। दसवीं फेल मास्टरमाइंड सहित तीन को विभिन्न सेवाओं के रूप में प्रच्छन्न धोखाधड़ी वाली फाइलें बनाने और बेचने के आरोप में गिरफ्तार किया गया, जिन्होंने खच्चर खातों के माध्यम से लाखों कमाए। वे मुंबई के 200 से अधिक धोखाधड़ी मामलों से जुड़े हैं।