नालासोपारा : प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने प्रेयसीसह तिच्या आईचा खून केला. त्यानंतर त्याने गळा कापून आत्महत्येचाही प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (दि. २९) दुपारी विरारच्या गणपती मंदिर परिसराजवळील पूनम आकांक्षा इमारतीत घडली.
नालासोपारा येथील मोरेगावात राहणाऱ्या शिवम उपाध्याय (२७) याचे नॅन्सी मिश्रा (२४) हिच्याशी प्रेमसंबंध होते. लग्नाबद्दल चर्चा करण्यासाठी तो नॅन्सीच्या विरार पश्चिम येथील पूनम आकांक्षा इमारतीतील घरी गेला होता. त्याने लग्नाचा विषय काढल्यावर नॅन्सीची आई सरिता मिश्रा (४८) यांनी विरोध केला. त्यामुळे तिघांमध्ये भांडण झाले. वाद विकोपाला गेला आणि शिवमने पूर्वनियोजित कटाचा भाग म्हणून फ्लॅटचा दरवाजा बंद केला आणि घरातील चाकूने दोघींवर सपासप वार केले. त्यात दोघींचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर आरोपीने ब्लेडने गळा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपी शिवम आणि नॅन्सी यांच्यात दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, त्यांच्या लग्नाला नॅन्सीच्या आईने विरोध केला होता. आईचा विरोध असल्याने नॅन्सीनेही लग्नास नकार दिला. या रागातून संतप्त झालेल्या शिवमने धारदार शस्त्राने दोघींवर वार केले, अशी प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली. आरोपीवर दुहेरी हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आरोपीची प्रकृती गंभीरफ्लॅटमध्ये जोरदार झटापट झाल्याने खिडकीची काच फुटली. गोंधळ ऐकून शेजाऱ्यांनी बोळींज पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी अग्निशमन पथकाच्या मदतीने फ्लॅटचा दरवाजा उघडला आणि दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी पाठवले. तर, स्वत:चा गळा कापून घेतलेल्या आरोपीला संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Web Summary : Upset by the refusal of his girlfriend and her mother to marriage, a man in Virar murdered them both. He then attempted suicide by slitting his own throat and is in critical condition. Police are investigating.
Web Summary : विरार में शादी से इनकार करने पर एक प्रेमी ने प्रेमिका और उसकी माँ की हत्या कर दी। बाद में उसने अपना गला काटकर आत्महत्या करने की कोशिश की, हालत गंभीर है। पुलिस जाँच कर रही है।