शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 08:34 IST

ठाकरेंचे सत्ताकेंद्र म्हणजे मातोश्रीच आणि तिथूनच त्यांनी सूत्रे हलवायला हवी होती, अशा भावना त्यावेळी व्यक्त झाल्या होत्या. 

मुंबई - आमदार, खासदारकीपासून स्वत:ला दूर ठेवत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हयातभर राजकारण केले आणि रिमोट कंट्रोलची भूमिका बजावली. त्यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशीच वाटचाल पुन्हा एकदा सुरू केली आहे. विधान परिषदेवर पुन्हा न जाण्याचा निर्णय घेत ‘मातोश्री’ने पिताश्रींच्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत भाजप-शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळाले होते; पण, अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द भाजपने पाळला नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेना-काँग्रेस आणि स्वत:चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी मोट बांधली आणि महाविकास आघाडीचा जन्म झाला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यानंतर ते विधान परिषदेवर निवडून गेले. त्यांच्या आधी त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे विधानसभेची निवडणूक जिंकलेले होते आणि ‘ठाकरे संसदीय सक्रिय राजकारणात जाणार नाहीत’ हा पण मोडला गेलेलाच होता; पण, २०१९ मध्ये सिनियर ठाकरे म्हणजे उद्धव त्याच मार्गावरून गेले. तेव्हा टीका आणि समर्थन दोन्हीही झाले. ठाकरेंचे सत्ताकेंद्र म्हणजे मातोश्रीच आणि तिथूनच त्यांनी सूत्रे हलवायला हवी होती, अशा भावना त्यावेळी व्यक्त झाल्या होत्या. 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर... २०२२ मध्ये राजकीय भूकंप झाला. शिवसेनेचे ४० आणि अपक्ष १० असे ५० आमदार घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले. उद्धव यांनी मुख्यमंत्रिपद घेतलेच नसते तर शिवसेनेत बंड झालेच नसते, असा एक तर्क दिला गेला. १९९५ मध्ये शिवसेना-भाजपची सत्ता आली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी आधी मनोहर जोशी आणि नंतर नारायण राणेंना मुख्यमंत्री केले व स्वत: सत्तेबाहेरच राहिले; पण, नियंत्रण त्यांचेच होते. गेल्या आठ वर्षांत बरेच पाणी वाहून गेले. २०२४ मध्ये आदित्य पुन्हा विधानसभेवर निवडून गेले. उद्धव हे विधान परिषदेचे सदस्य होतेच; पण, यावेळी ते पुन्हा विधान परिषदेवर जातील की बाळासाहेबांच्या ‘रिमोट कंट्रोल’ मार्गाने जातील, याविषयी प्रचंड उत्सुकता होती. आता त्यांनी बाळासाहेबांचा मार्ग निवडला आहे, आपल्या वडिलांसारखे आपल्या पक्षाला ते गतवैभव मिळवून देतील का, हे पाहणे आता महत्त्वाचे असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Thackeray follows Balasaheb's path: Will remote control bring glory?

Web Summary : Uddhav Thackeray emulates his father, Balasaheb, by staying out of legislative roles. He aims to control the party remotely, mirroring Balasaheb's strategy. The question is whether this approach will restore the party's past glory, especially after recent political upheavals and power shifts within the Shiv Sena.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे