शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 08:55 IST

1 / 9
Indian Currency Printing: प्रत्येक नोटेवर असलेल्या 'इनसेट लेटर' (Inset Letter) वरून ती कोणत्या प्रेसमध्ये छापली गेली आहे हे समजतं. छपाईनंतर चलन थेट बाजारात जात नाही, तर आरबीआयच्या (RBI) माध्यमातून सुमारे ४,०७५ 'करन्सी चेस्ट'मध्ये सुरक्षित ठेवले जाते आणि त्यानंतर बँकिंग प्रणालीद्वारे ते सामान्य जनतेपर्यंत पोहोचते. यामुळे संपूर्ण देशात चलनाचे सुरक्षित आणि नियंत्रित वितरण सुनिश्चित होते. तुमच्या खिशातील नोट कुठे छापली जाते आणि त्यावरील अक्षरांचा अर्थ काय असतो, हे जाणून घेऊया.
2 / 9
यूपीआय (UPI) येण्यापूर्वी प्रत्येक व्यक्ती आपले सर्व खर्च रोखीनेच करत होती. खिशात १०० किंवा ५०० रुपयांच्या नोटा असणं ही सामान्य बाब होती, पण या नोटा कुठे छापल्या जातात असा विचार तुम्ही कधी केला आहे का? भारतीय चलनाचा इतिहास नेहमीच जुना राहिला आहे. भारतीय नोटा छापण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकारकडे असते. यासाठी भारतात ४ प्रिंन्टिंग प्रेस आहेत. येथेच नोटा छापल्या जातात आणि भारतीय चलनाची नाणी देखील चार टांकसाळींमध्ये तयार केली जातात.
3 / 9
भारतात नोटा छापण्यासाठी पहिली प्रिंन्टिंग प्रेस १९२६ मध्ये महाराष्ट्रातील नाशिक येथे सुरू करण्यात आली होती, जिथे १०, १०० आणि १००० रुपयांच्या नोटा छापल्या जात असत. तरीही त्या काळात काही नोटा इंग्लंडहूनही मागवल्या जात होत्या. स्वातंत्र्यापर्यंत म्हणजेच १९४७ पर्यंत नोटा छापण्याचे काम प्रामुख्याने नाशिक प्रेसच करत राहिली. नंतर १९७५ मध्ये मध्य प्रदेशातील देवास येथे दुसरी प्रेस सुरू झाली आणि १९९७ पर्यंत देशात या दोन प्रेसमधूनच नोटांची छपाई होत राहिली.
4 / 9
भारतात छापल्या जाणाऱ्या करन्सी नोटेवर सिरीयल नंबरजवळ एक छोटं इंग्रजी अक्षर असतं, जे ती नोट कोणत्या प्रिंटिंग प्रेसमध्ये तयार केली गेली आहे हे दर्शवतं. नोटांच्या ट्रेसिंगसाठी आणि सुरक्षेसाठी ही व्यवस्था केली जाते. प्रत्येक प्रेसला अक्षरांचा वेगळा गट देण्यात आला आहे जेणेकरून ओळख पटवणं सोपं होईल.
5 / 9
म्हैसूर (कर्नाटक) मध्ये छापलेल्या नोटांवर सहसा कोणतंही 'इनसेट लेटर' नसते किंवा मग A, B, C, D सारखी अक्षरे आढळतात. देवास (मध्य प्रदेश) मधून छापलेल्या नोटांवर E, F, G, H, K असतात, तर नाशिकच्या (महाराष्ट्र) नोटांवर L, M, N, P, Q ही अक्षरे दिसतात. तसेच सालबोनी (पश्चिम बंगाल) मधून जारी केलेल्या नोटांवर R, S, T, U, V ही अक्षरे असतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या नोटेवर “M” लिहिले असेल तर ती नाशिक प्रेसमध्ये छापली आहे आणि “R” असल्यास ती सालबोनीमध्ये तयार केली गेली असेल.
6 / 9
भारतात नाणी तयार करण्याचं काम चार सरकारी टांकसाळींमध्ये होते - मुंबई, हैदराबाद, कोलकाता आणि नोएडा, ज्यांचे संचलन 'सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड' (SPMCIL) अंतर्गत केलं जातं. या सर्व टांकसाळी वेगवेगळ्या ओळख चिन्हांच्या माध्यमातून नाण्यांवर आपली खूण लावतात, ज्यावरून ते नाणे कोणत्या टांकसाळीत तयार झालं आहे हे समजतं.
7 / 9
भारतीय रिझर्व्ह बँक कायद्याच्या कलम ३८ नुसार, नाणी टांकसाळीतून थेट बाजारात पाठवली जात नाहीत. प्रथम ही नाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (RBI) जातात आणि नंतर आरबीआय बँकिंग प्रणालीद्वारे ती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवते. अशा प्रकारे संपूर्ण सिस्टीम नियंत्रित आणि सुरक्षित राहते, जेणेकरून चलनाची गुणवत्ता आणि वितरणावर पूर्ण देखरेख ठेवता येईल.
8 / 9
प्रिंटिंग प्रेसमध्ये छापलेल्या नवीन नोटा प्रथम थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या शाखांच्या 'करन्सी चेस्ट'मध्ये पाठवल्या जातात. सुरक्षा आणि जलद वितरण सुनिश्चित करण्यासाठी अनेक प्रिंटिंग प्रेस आणि टांकसाळी रेल्वे नेटवर्कशी देखील जोडल्या गेल्या आहेत, जेणेकरून नोटा आणि नाणी देशाच्या वेगवेगळ्या भागांत लवकर आणि सुरक्षितपणे पोहोचू शकतील. सध्या देशभरात अशी सुमारे ४,०७५ करन्सी चेस्ट आहेत, जिथे रोकड सुरक्षितपणे ठेवली जाते आणि बँकिंग प्रणालीद्वारे पुढे पुरवली जाते.
9 / 9
करन्सी चेस्ट ही मुळात एक सुरक्षित स्टोरेज प्रणाली असते, जिथे बँक नोटा आणि नाण्यांचा मोठा साठा आरबीआयतर्फे ठेवला जातो. याची सुरुवात स्टेट बँक ऑफ इंडियापासून झाली होती, पण आता यात अनेक बँकांचा समावेश आहे जसं की राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, विदेशी बँका, राज्य सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका. या चेस्टच्या मदतीनं देशात चलनाचं संतुलित आणि नियंत्रित वितरण सुनिश्चित केलं जातं.
टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकMONEYपैसा