गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात पाकिस्तानने मध्यस्थीचा प्रयत्न केला होता. तसेच अमेरिका आणि इराणला इस्लामाबादमध्ये झालेल्या चर्चेत समोरासमोर आणले होते. मात्र पाकिस्तानकडून सुरू असलेले मध्यस्थीसाठीचे हे प्रयत्न आता निष्फळ ठरताना दिसत आहेत. तसेच इराणनेही पाकिस्तानवर विश्वास ठेवण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे आता पाकिस्ताना इराण आणि अमेरिकेतील चर्चेमधून आता बाहेर पडताना दिसत असून, इराण आणि अमेरिका फोनवरून थेट संवाद साधत आहेत.
अल जजीराने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, आता अमेरिका पाकिस्तानमध्ये चर्चा करण्याऐवजी इराणसोबत फोनवरून संवाद साधण्यावर भर देत आहे. इराणसोबतची चर्चा आधीच्यापेक्षा अधिक चांगली झाली आहे. तसेच रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन यांच्यासोबतही डोनाल्ड ट्रम्प यांची चर्चा झाली असून, दोन्ही नेत्यांनी विविध मुद्द्यांवर सुमारे ९० हून अधिक मिनिटे चर्चा केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, इराणमधील खासदार इब्राहिम रेजाई यांनी सांगितले की, पाकिस्तानने मध्यस्थ म्हणून आपला विश्वास गमावला आहे. पाकिस्तान अमेरिकेसमोर झुकतो. मात्र पाकिस्तान हा आमचा एक चांगला मित्र आणि शेजारी आहे. पण परस्पर विश्वासातील कमतरतेमुळे पाकिस्तान हा चर्चेसाठी उपयुक्त मध्यस्थ ठरू शकत नाही.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या वेगवान घडामोडींदरम्यान, इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आणि भारताचा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यामध्येही बुधवारी संध्याकाळी चर्चा झाली. तसेच दोन्ही नेत्यांमध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Web Summary : America bypasses Pakistan's mediation efforts, engaging directly with Iran via phone. Trump also discussed various issues with Putin for over 90 minutes. Iran distrusts Pakistan's neutrality, preferring direct talks. India and Iran also discussed Hormuz Strait security.
Web Summary : अमेरिका ने पाकिस्तान की मध्यस्थता को दरकिनार कर ईरान से सीधे फोन पर बात की। ट्रंप ने पुतिन के साथ 90 मिनट से अधिक समय तक विभिन्न मुद्दों पर चर्चा की। ईरान को पाकिस्तान की तटस्थता पर संदेह है, इसलिए सीधी बातचीत पसंद है। भारत और ईरान ने भी होर्मुज जलडमरूमध्य सुरक्षा पर चर्चा की।