शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 08:41 IST

दोन अपघातांत नववधू उपवर मुलीसह पाच जण ठार

जळगाव - जिल्ह्यात बुधवार अपघातवार ठरून दोन अपघातांत पाच जण ठार, तर आठ जण जखमी झाले. यात तीन दिवसांपूर्वी लग्न झाल्यानंतर माहेरी परतणारी नववधू व ८ मे रोजी लग्न असल्याने वणी गडावर लग्नाची पत्रिका  ठेवून गावी परतत असलेल्या वाग्दत्त वधू मुलीसह पाच जण ठार झाले. वराड (ता.धरणगाव) व महादेव बांबरूड (ता.पाचोरा) येथे हे अपघात झाले. 

पहिल्या ओवाळणीला माहेरी येताना काळाचा घाला बुधवारी (दि. २९ एप्रिल) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास वराडजवळ (ता.धरणगाव) चाक निखळून वाहन समोरील टँकरवर धडकले. त्यात तीन दिवसांपूर्वी लग्न झाल्यानंतर पहिल्या ओवाळणीला माहेरी परतणारी नववधू पूजा रवी वाघळकर (वय २२), तिचे काका जगदीश चंद्रभान वाघळकर (५२) व मामा दत्तू तुळशीराम भागवत (५२, सर्व रा.महाकालीनगर, अकोला) हे ठार झाले, तसेच  नववधूचे वडील रवी प्रभाकर वाघळकर, चुलतभाऊ प्रेम भारत वाघळकर (२४), मेहुणे नितेश कडोळे (३५), अमोल गीते (३५), आजोबा तुळशीराम भागवत (६७), भाचा अंश नितेश कडोळे (१४) हे जखमी झाले.  

गडावर लग्नपत्रिका ठेवून परतताना टायर फुटलादुसरा अपघात पाचोरा तालुक्यातील महादेव बांबरुडजवळ झाला. कारचे टायर फुटून ती झाडावर धडकली. त्यात वणी गडावर लग्नपत्रिका ठेवून गावी परतणारी वाग्दत्त वधू शिखा विनायक बेलसरे (२७) आणि तिच्या शेजारी राहणाऱ्या मीना सुनील मानकर (४५, दोन्ही रा.काशीकर कॉलनी, परतवाडा, जि.अमरावती) या दोन्ही ठार झाल्या, तसेच शिखाचा भाऊ शुभम बेलसरे, मीना मानकर यांचे पती सुनील जखमी झाले आहेत. शिखा हिचे ८ मे रोजी लग्न होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy strikes: Newlywed, bride-to-be killed in separate Jalgaon accidents.

Web Summary : Jalgaon witnessed two fatal accidents claiming five lives. A newlywed returning home and a bride-to-be, set to marry May 8th, died in separate incidents, leaving several injured. One accident occurred near Varad, the other near Mahadev Bamerud.
टॅग्स :Accidentअपघात