शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
हरभजन सिंगविरोधात समर्थकांचा रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
4
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
5
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
6
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
7
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
8
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
9
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
10
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
11
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
18
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
19
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
20
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर शहरातील १५ आरएमसी प्रकल्प सील;महापालिकेच्या शोधपथकाकडून २२ प्रकल्पांची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 16:18 IST

- नियमभंग केल्याने कारवाई; धूळ नियंत्रणासाठी यंत्रणांचा अभाव, पाण्याची फवारणी न करणे, पर्यावरणीय नियमांकडे दुर्लक्ष करणे भोवले

पिंपरी : शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने अखेर कडक भूमिका घेत रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांवर धडक कारवाई केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने लक्ष वेधत ‘शहरातील आरएमसी प्रकल्पांवर कारवाई होणार का’, या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर जाग आलेल्या महापालिकेच्या पर्यावरण विभागाने एकूण २२ प्रकल्पांची तपासणी करत नियमभंग करणारे १५ प्रकल्प सील केले आहेत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १७ ऑक्टोबर २०२५ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरातील २२ आरएमसी प्रकल्पांवर उपद्रव शोधपथकांनी सखोल पाहणी केली. तपासणीत धूळ नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणांचा अभाव, परिसरात पाण्याची फवारणी न करणे, उघड्यावर साहित्य साठवणे, तसेच पर्यावरणीय नियमांकडे दुर्लक्ष केल्याच्या गंभीर बाबी समोर आल्या. परिणामी, अशा १५ प्रकल्पांवर तत्काळ सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली.

उर्वरित प्रकल्पांनाही महापालिकेने इशारा दिला आहे. हवा गुणवत्ता निरीक्षण प्रणाली बसविणे, प्रकल्पाभोवती शेड्स उभारणे, नियमित पाण्याची फवारणी करणे आणि धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. शहरात बांधकाम आणि औद्योगिक प्रकल्पांमुळे निर्माण होणाऱ्या धूळकणांमुळे वायू प्रदूषणात मोठी भर पडत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने महापालिकेने ही मोहीम हाती घेतली आहे.

या आरएमसी प्रकल्पांवर केली महापालिकेने कारवाई...

१. वेलकॉन आरएमसी, भीमनगर, मोशी२. ओम डेव्हलपर्स अँड बिल्डर्स, रावेत

३. पी.आर. इन्फ्राटेक, पवारवस्ती, ताथवडे४. डीएमआर बिल्डर्स प्रा. लि. (एनएचएझ प्रोजेक्ट), पवार वस्ती, ताथवडे

५. क्लिनर्जी कन्स्ट्रक्शन प्रा. लि. आदर्शनगर, मोशी६. ए अँड ए इन्फ्रा प्रा. लि./ वाघेश्वर आरएमसी प्लांट, मोशी

७. मोहनलाल मथराणी प्रायव्हेट लिमिटेड (आरएमसी प्लांट), मोशी८. ग्रे स्टोन आरएमसी प्लांट, सीएनजी-पेट्रोल पंपाच्या मागे, पिंपळे निलख

९. श्वेता आरएमसी प्लांट (मार्लिन ग्रुप), वाकड१०. एम इन्फ्रा आरएमसी प्लांट, ताजणे वस्ती, पुनावळे

११. एम कॉर्न आरएमसी प्लांट, काटे वस्ती, पुनावळे१२. जे. कुमार आरएमसी प्लांट, जुना देहू-आळंदी रोड, भीमनगर, पिंपरी

१३. शिवांश कन्स्ट्रक्शन (आरएमसी प्लांट), चऱ्होली१४. नागेश्वर इन्फ्रा आरएमसी प्लांट, डुडुळगाव

१५) भाटे अँड राजे आरएमसी प्लांट, तापकीर मळा, रहाटणी

शहरातील आरएमसी प्लांट्स आणि बांधकाम प्रकल्पांनी बांधकाम ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे अनिवार्य आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता तात्काळ कारवाई केली जात आहे. पुढील काळातही अशी तपासणी मोहीम राबवून प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कडक नियंत्रण ठेवण्यात येईल. - संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, महापालिका

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri-Chinchwad Seals 15 RMC Plants Amidst Pollution Concerns.

Web Summary : Pimpri-Chinchwad Municipal Corporation sealed 15 RMC plants for violating pollution norms. Inspections revealed lack of dust control measures. Remaining plants were warned of strict action for non-compliance, as the city tackles rising air pollution from construction activities.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे