भाजप महिला पदाधिकाऱ्याला मारहाण; भाजप ‘युमो’चे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 19:35 IST2025-10-30T19:34:58+5:302025-10-30T19:35:41+5:30

याप्रकरणी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे याच्यासह इतर सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

pimpari-chinchwad crime bjp woman office bearer assaulted BJP umno state president Anup More resigns | भाजप महिला पदाधिकाऱ्याला मारहाण; भाजप ‘युमो’चे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचा राजीनामा

भाजप महिला पदाधिकाऱ्याला मारहाण; भाजप ‘युमो’चे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचा राजीनामा

पिंपरी: भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याला भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) प्रदेशाध्यक्षाच्या नावाने टोळक्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना चिंचवड येथे घडली. याप्रकरणी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे याच्यासह इतर सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यानंतर आज भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी गुरुवारी (दि ३०) पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिला आहे.

अनुप मोरे यांनी राजीनामा पत्र दिले आहे. मोरे म्हणाले, गेले काही दिवसांपासून माझ्यावर खोटे आरोप केले जातात. माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होऊ शकते. माझे आई वडील माझे कुटुंब आणि मी गेली ४० वर्षांपासून भाजपाचे काम प्रामाणिकपणे अविरत करत आहे. बुध अध्यक्ष ते भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष पर्यंत पोहोचण्यासाठी पार्टीने माझ्यावर विश्वास टाकला.माझ्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये,  म्हणून मी राजीनामा देत आहे.'



नेमकं काय आहे प्रकरण

याप्रकरणी ३६ वर्षीय पीडित महिलेने २६ ऑक्टोबर रोजी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी महिला भाजपाची पदाधिकारी आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे (वय ४३, रा. निगडी प्राधिकरण), अनिता कृष्णा तिपाले, एकविरा शरीफ खान, प्रवीण यादव, आशिष राऊत, गौरव गोळे, सागर घोरपडे व जयेश मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास फिर्यादी महिला त्यांच्या ओळखीतील एका व्यक्तीला भेटण्यासाठी चिंचवड येथे गेल्या होत्या. दरम्यान, बंगल्याबाहेर संशयितांनी आमचा दादा अनुप मोरे येथे असताना तू येथे का आलीस? तुला मारून टाकू. तू एकटी राहतेस, अनुप मोरेने तुला मारून टाकायला सांगितले आहे. तुला अपघातात गाडीने उडवू, आमचे आमच्या दादावर खूप प्रेम आहे. तुला बदनाम करून जगणे मुश्किल करू. अनुप मोरे हा आमचा बाप आहे, तो आम्हाला सांभाळून घेईल, असे म्हणत धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी महिला पुन्हा बंगल्यात परत गेली.

त्यावेळी एक व्यक्ती कार घेऊन फिर्यादी महिलेला सोडायला आला असता, अनेक महिलांनी फिर्यादी महिलेच्या गाडीला घेराव घातला. फिर्यादी महिला तक्रार देण्यासाठी चिंचवड पोलिस ठाण्यात गेली असता, अनिता तिपाले व एकविरा खान यांनी त्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली. तक्रार नोंदवून पोलिस ठाण्याच्या बाहेर येताच फिर्यादी महिलेला पुन्हा शंभर जणांच्या टोळक्याने धमकी दिली. तुला मारून टाकू असे त्यांनी धमकावले, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील तपास करत आहेत.

पोलिस म्हणतात.. अनावधानाने राहिले नाव

पीडित महिलेने फिर्याद देताना जबाबात आठ जणांची नावे नमूद केली. त्यातील सात जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अनुप मोरे याचा आरोपींच्या नावामध्ये समावेश का केला नाही, अशी विचारणा फिर्यादी महिलेने केली. त्यानंतर पोलिसांनी अनुप मोरे याच्या नावाचा आरोपींमध्ये समावेश केला. अनावधानाने अनुप मोरे याचे नाव राहून गेले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title : भाजपा महिला पदाधिकारी से मारपीट; भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अनुप मोरे का इस्तीफा

Web Summary : हमले के आरोपों के बाद, भाजपा नेता अनुप मोरे ने युवा मोर्चा के अध्यक्ष पद से इस्तीफा दे दिया। चिंचवड में एक महिला भाजपा अधिकारी को धमकी दी गई, जिसके बाद मोरे और अन्य के खिलाफ कथित धमकी और हमले के लिए पुलिस में शिकायत दर्ज कराई गई। मोरे ने आरोपों से इनकार किया, और इसे बदनाम करने का अभियान बताया।

Web Title : BJP Leader Assaulted; BJP Youth Wing President Anup More Resigns

Web Summary : Following assault allegations, BJP leader Anup More resigned as Yuva Morcha president. A female BJP official was threatened in Chinchwad, prompting a police complaint against More and others for alleged intimidation and assault. More denies the charges, citing a smear campaign.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.