Pune: ऑनलाइन बेटिंगमुळे कर्जबाजारी झालेल्या हिंजवडीतील २४ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याने आयुष्य संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 11:28 IST2026-01-07T11:28:51+5:302026-01-07T11:28:51+5:30
Pune IT Engineer Death: त्या संदेशात ऑनलाइन सट्टा व बेटिंगमुळे मोठे कर्ज झाले असून, त्याच आर्थिक ओझ्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Pune: ऑनलाइन बेटिंगमुळे कर्जबाजारी झालेल्या हिंजवडीतील २४ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याने आयुष्य संपवलं
पिंपरी: हिंजवडी आयटी पार्कमध्ये कार्यरत असलेल्या २४ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याने ऑनलाइन जुगारात झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी (६ जानेवारी) पहाटे उघडकीस आली. हिंजवडीतील खासगी कंपनीच्या कॅन्टीनच्या स्वच्छतागृहात मोबाइल चार्जरच्या केबलच्या साहाय्याने त्याने गळफास घेत आत्महत्या केली.
सुजल विनोद ओसवाल (वय २४, रा. वानवडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, तो हिंजवडीतील एका खासगी कंपनीत कार्यरत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजल ओसवाल हा कंपनीच्या कँटीन परिसरातील स्वच्छतागृहात गेला आणि तेथे मोबाइल चार्जिंग केबलच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी सुजल ओसवाल याने नातेवाइकांना मोबाइलवर संदेश पाठवून आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. त्या संदेशात ऑनलाइन सट्टा व बेटिंगमुळे मोठे कर्ज झाले असून, त्याच आर्थिक ओझ्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले.