शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
3
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
6
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
7
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
8
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
9
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
10
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
11
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
12
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
13
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
14
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
16
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
17
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
18
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
19
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
20
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
Daily Top 2Weekly Top 5

RTE admission : चुकीच्या आरटीई पडताळणी केंद्रामुळे पालकांची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 14:44 IST

RTE admission - प्रशासनाच्या असंवेदनशील कारभारावर नाराजीचा सूर

पिंपरी : शहरातील खासगी शाळांमध्ये आरटीई प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. चुकीचे पडताळणी केंद्र नमूद झाल्यामुळे पालकांना पौड, पिंपरी आणि आकुर्डी येथे वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. या संदर्भात जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

आरटीई सोडत जाहीर झाल्यानंतर कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, काही शाळांच्या प्रवेशपत्रांवर मुळशी तालुक्यातील पौड येथील केंद्राचा पत्ता देण्यात आला. प्रत्यक्षात या विद्यार्थ्यांची पडताळणी पिंपरी किंवा आकुर्डी येथील केंद्रावर होणार असल्याचे तेथे सांगण्यात आले. त्यामुळे पालकांना एकाच दिवशी अनेक ठिकाणी जावे लागत असून मनस्ताप सहन करावा लागत आहे.वाकड, पुनावळे आणि ताथवडे परिसरातील शाळांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रथम पौड येथे धाव घेतली. मात्र, तेथे पडताळणी होणार नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर त्यांनी पिंपरी आणि आकुर्डी केंद्रांकडे मोर्चा वळवला. या ठिकाणीही कर्मचारी अनुपस्थित असल्याने पालकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागली.

अपुरी मनुष्यबळ आणि स्पष्ट मार्गदर्शनाचा अभाव यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे पालकांचे म्हणणे आहे. अनेकांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. फोनवर कोणतीही माहिती मिळत नसल्याने अडचणीत भर पडत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 प्रवेशपत्रावर चुकीचे पडताळणी केंद्र नमूद केल्यामुळे पालकांची मोठी गैरसोय होत आहे. चौकशीसाठी दिलेले फोन क्रमांक उचलले जात नसल्याने अडचणी वाढत आहेत. ही जबाबदारी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची असून, प्रशासनाची बेफिकिरी आणि असंवेदनशीलता स्पष्ट होत आहे. प्रवेश प्रक्रिया २० तारखेपर्यंत पूर्ण करायची असल्याने पालक हतबल झाले आहेत. महापालिका व शिक्षण विभागाने तातडीने मदत व तक्रार केंद्रांचे संपर्क क्रमांक जाहीर करावेत. - मुकुंद किर्दत, आप पालक युनियन, आम आदमी पार्टी. 

कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर पाठवले जात असून, प्रशासनाकडून स्पष्ट सूचना दिल्या जात नाहीत. पौड, पिंपरी आणि आकुर्डी या ठिकाणी जाण्यासाठी भर उन्हात धावपळ होत आहे. यावर तातडीने उपाययोजना करावी. - नीलेश गुजर, पालक, ताथवडे. 

English
हिंदी सारांश
Web Title : RTE Admission Chaos: Parents Scramble Due to Incorrect Verification Centers

Web Summary : RTE admission verification issues in Pimpri-Chinchwad have parents scrambling due to incorrect center assignments. Verification centers are sending parents to multiple locations, causing frustration and delays. Lack of clear guidance and staff shortages exacerbate the problem.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रEducation Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण