शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या धर्तीवर पुणे आणि नागपुरातही नाईट लाईफ

By admin | Updated: August 12, 2016 22:09 IST

मुंबईच्या धर्तीवर पुणे आणि नागपुरात आता रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार उघडे ठेवण्यास शासनाने परवानगी दिली

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 12 - मुंबईच्या धर्तीवर पुणे आणि नागपुरात आता रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार उघडे ठेवण्यास शासनाने परवानगी दिली असून राज्यपालांच्या आदेशाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये यापुढे रात्री दिड वाजेपर्यंत हॉटेल्स उघडी राहणार आहेत. यापुर्वी मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, नव्या आदेशानुसार पुणे आणि नागपुर पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रातील हॉटेलसाठी रात्री दिडची वेळ निश्चित करण्यात आल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.पुणे आयुक्तालयातील हॉटेल्स रात्री अकरा वाजता पोलिसांकडून बंद करण्यात येत होते. काही ठराविकच हॉटेल्स आणि बारला पोलिसांकडून अभय दिले जात होते. अनेकदा ओरड होऊनही या हॉटेल्सवर कारवाई केली जात नव्हती. मात्र, या नव्या आदेशामुळे सर्वच हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. रात्री उशीरापर्यंत हॉटेल्स सुरु राहणार असल्यामुळे पुणेकरांनाही उशिरापर्यंत हॉटेलिंगचा आस्वाद घेता येणार आहे. बार आणि रेस्टॉरंटमधून रात्री उशिरापर्यंत मद्य पुरवण्यासही परवानगी देण्यात आलेली असल्यामुळे मद्यपींचेही फावणार आहे. या नव्या आदेशानुसार, औरंगाबाद, नाशिक आणि अमरावती तसेच सोलापूर आयुक्तालयाच्या हद्दीतील हॉटेल्सना रात्री साडेअकरापर्यंत खाद्यपदार्थ व मद्यपदार्थ पुरवण्यास परवानगी देण्यात आली असून केवळ हॉटेल्सची वेळ साडेबारा असणार आहे. उर्वरीत महाराष्ट्रासाठी खाद्यपदार्थांसह मद्य देणा-या हॉटेल्सची वेळ रात्री दहा तर केवळ खाद्यपदार्थ देणा-या हॉटेल्सची वेळ साडेअकरा करण्यात आली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या आदेशाने बजावलेला हा आदेश गृहमंत्रालयाने जारी केला आहे.