शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या वादातून आई-वडिलांना बेदम मारहाण

By admin | Updated: April 19, 2017 04:12 IST

भगतवाडी (ता. इंदापूर) येथे जमीनवाटपाच्या वादातून थोरल्या मुलाकडूनच स्वत:च्या आई-वडील व लहान भावांना मारहाण झाली.

बावडा : भगतवाडी (ता. इंदापूर) येथे जमीनवाटपाच्या वादातून थोरल्या मुलाकडूनच स्वत:च्या आई-वडील व लहान भावांना मारहाण झाली. यात वडीलव एक भाऊ गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बावडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भगतवाडी (ता. इंदापूर) येथील श्रीपती गणपत काटकर हे पत्नी गोकुळा, मुले सतीश, महेश व सुना, नातवंडे असे एकत्रित राहतात, तर थोरला मुलगा समाधान त्याची पत्नी व मुलगी यांच्यासह शेजारीच राहतो. असे असताना गेल्या तीन वर्षांपूर्वी वडिलोपार्जित जमिनीचे वाटप आपापसांत बैठकीतून करण्यात आले होते. परंतु थोरला मुलगा समाधान यास हे वाटप मान्य नव्हते. या कारणामुळे तो सतत या ना त्या कारणाने घरात येऊन आई-वडील व भावांबरोबर वाद घालत असे.याच कारणावरून गुरुवारी (दि. १३) रात्री नऊच्या सुमारास समाधान याने बेकायदा जमाव जमवत आई-वडील व भावांवर जिवे मारण्याच्या हेतूने लाकडी दांडके, लोखंडी सळई, मिरची पूड आदींच्या साहाय्याने तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत हल्ला केला. यामध्ये समाधानच्या सोबतीला त्याचा मेहुणा बापू दिलीप शिंदे (रा. शेटफळ हवेली), अक्षय सुरेश वाघ, भैया नाना वाघ (दोघेही रा. बागेचीवाडी, ता. माळशिरस) तसेच अन्य चार साथीदारांनी बेदम मारहाण केली. अन्य चार लोकांनी डोके व तोंड काळ्या टोप्यांनी झाकल्याने ते ओळखू आले नाहीत. या सर्वांनी वडील श्रीपती, आई व दोन भाऊ यांना डोक्यात, पाठीवर, छातीवर मारल्याने यातील श्रीपती व महेश हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अकलूज (ता. माळशिरस) येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आई गोकुळा व भाऊ सतीश यांना किरकोळ दुखापत झाली असल्याने प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले. या गुन्ह्यात बापू शिंदे याच्या (एमएच ४२/ २८४१) या क्रूझर जीपचा हल्लेखोरांनी पळून जाण्यासाठी वापर केला. बावडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्रसिंह निंबाळकर हे अधिक तपास करीत आहेत.