चिखलीत ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दाजी-मेव्हण्यांचा मृत्यू; फरार ट्रक चालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 10:08 IST2024-11-26T10:07:30+5:302024-11-26T10:08:26+5:30

दाजी आणि मेहुणे दुचाकीवरून जात असताना ट्रकने मागून धडक दिली

Mother-in-law on two-wheeler killed in truck collision in mud; The absconding truck driver was handcuffed by the police | चिखलीत ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दाजी-मेव्हण्यांचा मृत्यू; फरार ट्रक चालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चिखलीत ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दाजी-मेव्हण्यांचा मृत्यू; फरार ट्रक चालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पिंपरी : चिखली परिसरातील जाधववाडी येथे एका ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक पळून गेला. त्याला चिखलीपोलिसांनी अटक केली आहे. हा अपघात शनिवारी (दि. २३) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला.

गणेश शहाजी देशमाने (वय ४१), हनुमंत जीवन धारवडकर (४०) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी अनिकेत शहाजी देशमाने (२६, रा. चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हुलाजी ऊर्फ मोहन महादू सोडगीर (४२, रा. मोशी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ गणेश देशमाने आणि त्यांचा मेहुणा हनुमंत धारवडकर हे दुचाकीवरून जात होते. ते सावता माळी रोडवर आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक पळून गेला. पोलिसांनी त्याला अटक केली.

Web Title: Mother-in-law on two-wheeler killed in truck collision in mud; The absconding truck driver was handcuffed by the police