शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

Pimpri Chinchwad: वाहनांची तोडफोड करत टोळक्याचा हल्ला, चिंचवडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 1:05 PM

या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाल्याची माहिती चिंचवड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली....

पिंपरी : आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड करत दोन जणांसह महिलेवर जीवघेणा हल्ला केला. या हल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२५) मध्यरात्री दीडच्या सुमारास आनंदनगर, चिंचवड येथे घडली. सुभाष शिंदे (रा.चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नरेश उर्फ कृष्णा भंडारी (वय १९), आदित्य आणि त्यांचा एक साथीदार (सर्व रा. आनंदनगर, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाल्याची माहिती चिंचवड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरांसमोर पार्क केलेल्या वाहनांची संशयित आरोपी तोडफोड करत होते. तसेच कोयता, लोखंडी रॉड, सिमेंट गट्टू या हत्यारांसह दहशत माजवत होते. त्यांनी दोन जणांसह एका महिलेवर जीवघेणा हल्ला केला. तसेच परिसरातील आठ ते नऊ वाहनांची तोडफोड केली. टोळक्याचा धुडगूस सुरू असताना फिर्यादी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयित आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. यात शिंदे यांच्यासह चार जण गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तोडफोड करणार्यांना चांगला चोप दिला. यात आरोपी नरेश हा जखमी झाला.

टॅग्स :Puneपुणेchinchwad-acचिंचवडpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड