शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एन्काऊंटरच्या भीतीने मुख्य संशयित न्यायालयात हजर; न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची मागणी

By नारायण बडगुजर | Updated: May 5, 2026 22:27 IST

भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी खून प्रकरण, फेक एन्काऊंटरची शक्यता व्यक्त

नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी खून प्रकरणातील मुख्य संशयित आफताब समीर शेख याने संभाव्य एन्काऊंटरच्या भीतीने वडगाव मावळ न्यायालयात हजर होत सोमवारी  (दि. ४ मे) लेखी निवेदन सादर केले. पोलिसांकडून न्याय प्रक्रियेच्या विरुद्ध जाऊन फेक एन्काऊंटर होण्याची शक्यता असल्याची भीती त्याने व्यक्त केली आहे.

देहूरोड येथे आठ दिवसांपूर्वी रमेश गुरूस्वामी रेड्डी (वय ४२, रा. राजीव गांधीनगर, देहूरोड) यांचा गोळीबार करून निर्घृण खून करण्यात आला होता. दरम्यान रमेश याचा भाऊ विक्रम गुरुस्वामी रेड्डी याचा १३ फेब्रुवारी २०२५ रोजी गोळीबार करून खून करण्यात आला होता. विक्रम याच्या खुनाच्या गुन्ह्यात आफताब शेख याची आई आणि भाऊ  तुरुंगात आहेत. त्यांच्या जामिनाला रमेश रेड्डी विरोध करत होता. या रागातून रमेश रेड्डी यांचा खून करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी आफताब शेख याच्यासह अन्य संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता.

दरम्यान, या गुन्ह्यातील काही संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, मुख्य संशयित आफताब हा फरार होता. त्याचा विविध पद्धतीने शोध सुरू असतानाच त्याने थेट न्यायालयात हजेरी लावली. वडगाव मावळ न्यायालयात निवेदन सादर केले. चौकशीदरम्यान पोलिसांनी मला दिसताच क्षणी मारण्याचे आदेश असल्याचे सांगितले जात आहे, असा गंभीर आरोप आफताब याने निवेदनातून केला आहे. तसेच पोलिसांकडून फेक एन्काऊंटर होण्याची भीती व्यक्त करत आपल्या जीवाला धोका असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे न्यायालयात आत्मसमर्पण करण्यास तयार असून, पुढील कारवाईपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवावे, अशी विनंतीही त्याने केली आहे. यापूर्वी पुणे न्यायालयात अर्ज दाखल केला होता; मात्र पुणे न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेर असल्याने तो अर्ज नामंजूर झाल्याचेही त्याने नमूद केले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपूर्वीच संशयितांनी रेड्डी यांच्या घरासमोर उभे राहून, “आई व भावाला जामीन मिळाला नाही तर सर्वांना जीवे मारू,” अशी धमकी दिली होती. त्यानंतर २८ एप्रिल रोजी रात्री नऊच्या सुमारास पाळत ठेवून रमेश रेड्डी यांच्यावर २१ हून अधिक गोळ्या झाडत खून करण्यात आला होता.

पोलिस घेणार ताब्यात 

दरम्यान, न्यायालयात आत्मसमर्पण केल्यानंतर संशयित आफताब शेख याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासकामी त्याला ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली आहे. त्याबाबत मंगळवारी (दि. ५ मे) पोलिसांनी न्यायालयाकडे निवेदन सादर केले आहे. त्यानुसार, पोलिस बुधवारी (दि. ६ मे) संशयित आफताब शेख याला ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Courtन्यायालयPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी