शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

जलतरण तलावात बुडून बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 23:37 IST

वडिलांकडे दुकानात जातो, असे सांगून रविवारला सकाळी १० वाजता घरून निघून गेलेल्या आणि त्यानंतर बेपत्ता झालेल्या एका १३ वर्षीय बालकाचा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील जलतरण तलावात सोमवारला सकाळी मृतदेह आढळून आला. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून जिल्हा क्रिडा संकुलातील सुरक्षेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर : शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वडिलांकडे दुकानात जातो, असे सांगून रविवारला सकाळी १० वाजता घरून निघून गेलेल्या आणि त्यानंतर बेपत्ता झालेल्या एका १३ वर्षीय बालकाचा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील जलतरण तलावात सोमवारला सकाळी मृतदेह आढळून आला. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून जिल्हा क्रिडा संकुलातील सुरक्षेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तोफिर शेख कय्यूम शेख (१५) रा.बैरागी वाडा, भंडारा असे मृत बालकाचे नाव आहे. रविवारी जलतरण तलाव बंद असतोे. त्याठिकाणी चौकीदार असतो. तोफिर शेख हा रविवारी सकाळी ११ वाजता घराबाहेर पडला. त्यानंतर तो आपल्या दोन मित्रांसह जलतरण तलावाच्या दिशेने गेला. जलतरण केंद्र बंद असल्यामुळे आवारभिंतीवरून उडी घेऊन हे तिघेही आतमध्ये शिरले. दरम्यान, जलतरण तलावात खोल पाण्यात गेल्याने तोफिर बुडू लागला. हे बघून त्याच्या दोन्ही मित्रांनी तिथून पळ काढला. तथापि, ते पळून जात असताना तेथील सुरक्षारक्षकाने त्यांना हटकले. त्या मुलांनी तोफिर तलावात बुडाल्याची माहिती सुरक्षा रक्षकाला दिली होती. परंतु, सुरक्षारक्षकाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता होत आहे. इकडे, दिवसभरापासून बेपत्ता असलेल्या तोफिरची शोधाशोध सुरू होती. तो बेपत्ता झाल्याची तक्रार भंडारा पोलिसात करण्यात आली होती.सोमवारी सकाळी जलतरण केंद्रात पोहण्यासाठी आलेल्या काही जणांना एका बालकाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही माहिती सकाळी क्रिडा संकुलात फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना माहित होताच जलतरण तलावावर गर्दी झाली. चौकशीअंती तो मृतदेह तोफिरचा असल्याचे स्पष्ट झाले. सुरक्षारक्षकाने तोफिरच्या मित्रांच्या सुचनेची वेळीच दखल घेतली असती तर कदाचित तोफिरचे प्राण वाचू शकले असता. जलतरण केंद्रात कोणतीही सुरक्षा नसल्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी, जलतरण केंद्र चालक व सुरक्षा रक्षकावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.क्रीडा अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणीक्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार असताना या संकुलाचे देखभाल आणि दुरूस्तीचे काम वेळोवेळी व्हायचे. भाग्यश्री बिले या क्रिडा अधिकारी म्हणून रूजू झाल्यापासून या क्रीडा संकुलाला दुर्देशेचे दशावतार सुरू झाले. या संकुल परिसरात सुविधांबाबत नागरिकांनी त्यांना यापूर्वी अनेकदा निवेदने दिले आहेत. परंतु कुठलिही उपाययोजना बिले यांनी केली नाही. दरम्यान, भंडारा शहरातील नागरिकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांना निलंबित करण्यात यावे आणि तोफिरच्या कुटुंबाला मदत करण्याची मागणी केली. दरम्यान, नागपूर येथून क्रीडा उपसंचालकांनी भंडारा जिल्हा क्रीडा संकुल कार्यालयाला भेट देऊन याबाबतची तपशिलवार माहिती जाणून घेतली. यासंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बिले यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात यावी, याबाबत प्रधान सचिवांशी चर्चा केली.पालकमंत्र्यांनी केले कुटुंबीयांचे सांत्वनजिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावात मृत्यू झालेल्या तोफिर शेख या बालकाच्या कुटुंबियांची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारला सायंकाळी भेट घेतली. घरी जावून शेख कुटुंबीयांचे सांत्वन केले. शासनाच्यावतीने शक्य ती सर्व मदत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी देऊन आपल्या दु:खात आम्ही सहभागी असल्याचे पालकमंत्र्यांनी या कुटुंबाला सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.