शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयएम’ची भीती दाखवून सनातनला वाचवू नका

By admin | Updated: September 30, 2015 02:43 IST

‘एमआयएम’ जर अतिरेकी कारवाया करत असेल तर जरूर या संघटनेवरही बंदी आणावी; परंतु एमआयएमविरोधात तसे गुन्हे दाखल नाहीत.

पुणे : ‘एमआयएम’ जर अतिरेकी कारवाया करत असेल तर जरूर या संघटनेवरही बंदी आणावी; परंतु एमआयएमविरोधात तसे गुन्हे दाखल नाहीत. त्याउलट सनातनच्या कार्यकर्त्यांवर अतिरेकी कारवायांचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मंत्री एकनाथ खडसेंनी ‘एमआयएम’चे नाव घेऊन सनातनला वाचवू नये, अशी टीका माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. सनातनी प्रवृत्तींविरोधात देश बचाव आघाडी रविवारी पुण्यात सभा घेत आहे. सनातनवर बंदी आणणे अशक्य आहे. जर या संघटनेवर बंदी आणायची असेल, तर अससुद्दीन ओवेसी आणि त्यांच्या एमआयएम पक्षावरही बंदी आणावी लागेल, असे विधान खडसे यांनी केले आहे. त्यासंदर्भात कोळसे बोलत होते. ते म्हणाले, ‘खडसे दिशाभूल करत आहेत. सनातनच्या काही कार्यकर्त्यांचा बॉम्ब तयार करत असताना मृत्यू झाला आहे. काही हिंसक घटनांप्रकरणी कार्यकर्त्यांना शिक्षा झालेली आहे. ही संघटना उघड उन्मादाची भाषा करत आहे. पोलिसांना धमक्या देत आहे. सनातनला सध्याचे राष्ट्रच मान्य नाही. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर या संघटनेने एक प्रकारचा आनंद व्यक्त केला आहे. या संघटनेवर बंदी आणण्यास हे सर्व पुरावे पुरेसे आहेत. मात्र, अशा सनातनी प्रवृत्ती या सरकारलाच हव्या आहेत.’ देशातील सर्व संस्थांचे संघीकरण झाले असून, सनातनी प्रवृत्ती वाढत आहेत. अगदी पोलीस व गुप्तचर यंत्रणांतही संघीय प्रवृत्ती आहेत. त्यामुळे याविरोधात देश बचाव आघाडी स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीच्या वतीने रविवारी (दि. ४) दुपारी ३ वाजता पुण्यात शनिवारवाड्यावर जाहीर सभा घेतली जाणार आहे. या सभेत माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, आमदार जितेंद्र आव्हाड, भाई वैद्य, एस. एम. मुश्रीफ, बिशप कांबळे, श्रीमंत कोकाटे, आनंद आंबेडकर, सुभाष वारे, प्रतिमा परदेशी, राहुल पोकळे आदी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.