तळेगाव दाभाडे येथे पेट्रोल पंपावरच डिझेल टँकरला आग; चालक जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 12:33 IST2026-04-16T12:32:41+5:302026-04-16T12:33:25+5:30

तळेगाव दाभाडे येथे पेट्रोल पंपावर नेहमीप्रमाणे डिझेलचा टँकर आला होता. सायंकाळी अचानक टँकरच्या व्हॉल्व्हने पेट घेतला.

Diesel tanker catches fire at petrol pump in Talegaon Dabhade; Driver injured | तळेगाव दाभाडे येथे पेट्रोल पंपावरच डिझेल टँकरला आग; चालक जखमी 

तळेगाव दाभाडे येथे पेट्रोल पंपावरच डिझेल टँकरला आग; चालक जखमी 

पिंपरी : तळेगाव दाभाडे येथे पेट्रोल पंपावर डिझेल टँकरच्या व्हॉल्व्हला अचानक आग लागल्याने एकच घबराट पसरली. नगरपालिकेच्या अग्निशामक पथकाने १५ मिनिटांत ही आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत टँकरचालक किरकोळ जखमी झाला. बुधवारी (दि. १५ एप्रिल) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली.

तळेगाव दाभाडे ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी याबाबत माहिती दिली. तळेगाव दाभाडे येथे पेट्रोल पंपावर नेहमीप्रमाणे डिझेलचा टँकर आला होता. सायंकाळी अचानक टँकरच्या व्हॉल्व्हने पेट घेतला.

हा प्रकार लक्षात येताच चालकाने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात त्याला किरकोळ भाजले. त्याला त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच तळेगाव दाभाडे नगरपालिकेचा अग्निशामक बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. पंधरा मिनिटांत आग आटोक्यात आणण्यात यश आले. सायंकाळी वर्दळीच्या वेळेस ही घटना घडल्याने बघ्यांची गर्दी झाली होती.

Web Title : तलेगांव दाभाड़े पेट्रोल पंप पर डीजल टैंकर में आग; ड्राइवर घायल

Web Summary : तलेगांव दाभाड़े के एक पेट्रोल पंप पर डीजल टैंकर में आग लग गई, जिससे ड्राइवर घायल हो गया। दमकल कर्मियों ने पंद्रह मिनट में आग पर काबू पा लिया। बुधवार की शाम व्यस्त समय के दौरान हुई इस घटना से दहशत फैल गई और भीड़ जमा हो गई।

Web Title : Diesel Tanker Fire at Talegaon Dabhade Petrol Pump; Driver Injured

Web Summary : A diesel tanker caught fire at a Talegaon Dabhade petrol pump, injuring the driver. Firefighters quickly controlled the blaze in fifteen minutes. The incident caused panic and drew a crowd during the busy evening hours on Wednesday.