IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं

Shreyas Iyer Breaks MS Dhoni and Rohit Sharma Records: मुंबई विरूद्धच्या सामन्याच पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने सीएसकेचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा यांना मागे टाकले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 09:16 IST2026-04-17T09:15:47+5:302026-04-17T09:16:42+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026: Shreyas Iyer Breaks MS Dhoni and Rohit Sharma Records In MI vs PBKS | IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं

IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं

आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात पंजाबने दमदार विजय मिळवला. पंजाबच्या विजयात कर्णधार श्रेयस अय्यरचा सिंहाचा वाटा आहे. त्याने ३५ चेंडूत ६६ धावा केल्या. या कामगिरीसह त्याने चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा यांना मागे टाकले आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात श्रेयस अय्यरने कर्णधारपदाला साजेसा खेळ करत ३५ चेंडूत ६६ धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत त्याने पाच चौकार आणि चार षटकार लगावले. या खेळीसह आयपीएलच्या इतिहासात कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने आतापर्यंत कर्णधार म्हणून २२ वेळा अशी कामगिरी बजावली आहे. या यादीत अय्यर संयुक्तपणे सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा: 

१) विराट कोहली- ४२ (१४२ डाव)
२) डेव्हिड वॉर्नर- ३३ (८३ डाव)
३)  गौतम गंभीर- ३१ (१२७ डाव)
४) रोहित शर्मा- २५ (१५७ डाव)
५) केएल राहुल- २४ (६४ डाव)
६) श्रेयस अय्यर- २२ (९० डाव)
७) एमएस धोनी- २२ (२०४ डाव)

याव्यतिरिक्त, कर्णधार म्हणून एका डावात ४ किंवा त्याहून अधिक षटकार मारण्याच्या बाबतीतही अय्यर (११ डाव) आता रोहित शर्मा (१० डाव) आणि केएल राहुल (१० डाव) यांच्या पुढे निघून गेला आहे. या यादीत धोनी अव्वल स्थानी आहे. त्याने तब्बल १५ वेळा अशी कामगिरी बजावून दाखवली आहे. त्यानंतर या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १२ वेळा एका डावात ४ किंवा त्याहून अधिक षटकार लगावले आहेत.

कर्णधार म्हणून एका डावात ४ किंवा त्याहून अधिक षटकार:

१) एमएस धोनी- १५
२) विराट कोहली- १२
३) श्रेयस अय्यर- ११
४) केएल राहुल- १०
५) रोहित शर्मा- १०

पंजाबचा दणदणीत विजय

मुंबईने दिलेल्या १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सने १६.३ षटकांत ३ गडी गमावून १९८ धावा करत विजय मिळवला. प्रबसिमरन सिंगने नाबाद ८० (३९ चेंडू) धावांची वादळी खेळी केली, तर अय्यरसोबत त्याने तिसऱ्या गड्यासाठी १३९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या विजयासह पंजाब किंग्स ५ सामन्यांत ९ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान आहे. तर, दुसरीकडे मुंबई इंडियन्सची अवस्था बिकट असून ५ सामन्यांत केवळ २ गुणांसह ते नवव्या क्रमांकावर आहेत.

Web Title : आईपीएल 2026: श्रेयस अय्यर ने धोनी, रोहित को पछाड़ा, रचा इतिहास।

Web Summary : श्रेयस अय्यर की तूफानी पारी से पंजाब किंग्स ने मुंबई इंडियंस पर जीत दर्ज की। अय्यर ने धोनी और रोहित को पीछे छोड़ कप्तान के तौर पर आईपीएल इतिहास में सबसे ज्यादा 50+ स्कोर का रिकॉर्ड बनाया। पंजाब शीर्ष पर।

Web Title : IPL 2026: Shreyas Iyer surpasses Dhoni, Rohit with captaincy feat.

Web Summary : Shreyas Iyer's explosive innings propelled Punjab Kings to victory over Mumbai Indians. His captaincy record surpasses Dhoni and Rohit, achieving a new milestone in IPL history with most 50+ scores as captain. Punjab tops the table.