शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीवर दरोडा पडला अन् शिवसेना पक्ष चोरीला गेला; जयंत पाटलांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 14:43 IST

निवडणूक आयोगाला हाताला धरून शिवसेनेची हत्या केली

पिंपरी : शेठ काय म्हणतील तेवढंच ऐकायची तयारी ठेवावी लागेल.  संविधानातील तरतुदीही बदलण्याची तयारी सुरू आहे. भारतीय लोकशाहीवर दरोडा पडला अन शिवसेना पक्ष चोरीला गेला, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

चिंचवड पोटनिवडणूकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ पिंपळे सौदागर येथे जयंत पाटील बोलत होते. यावेळी आमदार सुनील शेळके, डॉ. किरण लामटे , माजी आमदार विलास लांडे, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष महेबूब शेख, संजोग वाघेरे आदी उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, निवडणूक आयोगाला हाताला धरून शिवसेनेची हत्या केली. यानंतर स्थानिक पक्ष संपवले जातील. आम्ही १० वर्षे विरोधात राहिलो तरी आम्हांला प्रॉब्लेम नाही. पुढील दहा वर्षात लोकशाही टिकणार नाही. देशात सुधारणा काय केल्या यावर चर्चा नाही. केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीवर कोणी बोलत नाही. विकृती असणाऱ्या लोकांच्या हातात सध्या भाजप पक्ष गेला आहे. लोकसभेतील प्रश्नावर मोदींकडे उत्तरे नाहीत.बीबीसीवर धाड घातली. वर्तमानपत्र यांची गलचेपी होत आहे. लोकशाहीचा गळा घोटला जातोय. एलआयसी मध्ये सामान्य नागरिकांनी आयुष्याची पुंजी गुंतवली ती धोक्यात आली आहे. न्यायव्यवस्थाही दबावात काम करत आहेत. न्याय देणारा माणूस माझ्या मताचा असला पाहिजे. व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मर्यादित झालं आहे. युट्युब चॅनेलवरही बंदी येत आहे,असेही जयंत पाटील यांनी म्हटले.

टॅग्स :PuneपुणेJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी