शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 10:31 IST

NEET Exam News: नीट परीक्षेतील गोंधळातून दोन मार्कलिस्ट मिळाल्याने भिवंडीतील एका विद्यार्थिनीसह तिच्या पालकांना धक्का बसला असून, त्यातून नैराश्यग्रस्त होण्याची वेळ कुटुंबीयांवर आली आहे.

भिवंडी : नीट परीक्षेतील गोंधळातून दोन मार्कलिस्ट मिळाल्याने भिवंडीतील एका विद्यार्थिनीसह तिच्या पालकांना धक्का बसला असून, त्यातून नैराश्यग्रस्त होण्याची वेळ कुटुंबीयांवर आली आहे.शेलार गावातील यंत्रमाग कामगार कृष्णा पिनाटे यांची श्वेता ही मुलगी. २०२४ च्या नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याने तिने खचून न जाता पुन्हा जोरदार अभ्यास करून २०२५ ची नीट परीक्षा दिली. १४ जून रोजी जाहीर झालेल्या ऑनलाइन निकालपत्रात श्वेता हिला ४९२ गुण होते. तर ७६,३१९ ही 'ऑल इंडिया रॅक' होती. आनंदित होत श्वेता हिने निकालाची ऑनलाइन प्रत काढून वैद्यकीय शिक्षणासाठी अर्ज भरण्यास सुरुवात केली. रजिस्ट्रेशन केले व त्यानंतर आलेल्या सिलेक्शन यादीत श्वेता हिच्या नावापुढे २७५ गुण व 'ऑल इंडिया रैंकिंग' ५,१८,१८० असे दाखवण्यात आले. हे पाहताच श्वेता व तिच्या पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर तिने सीईटी सेल येथे चौकशी केली तर ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते त्यांच्याकडे चौकशी व तक्रार करा, असा सल्ला दिला. तिने १ नोव्हेंबर रोजी एमसीसी व एनटीए या संबंधित विभागासह केंद्रीय आरोग्य शिक्षण मंत्रालयाकडे तक्रार केली; पण तिच्या तक्रारीचे निवारण केलेले नाही. माझ्या यशावर फिरवले पाणीमला ४९२ गुण असताना नंतर ते गुण २७५ कसे झाले, असा प्रश्न मला पडला असून माझी नक्की कोणती मार्कलिस्ट खरी आहे, हेच कळत नाही. मी केलेल्या मेहनतीवर नीट परीक्षा मंडळाने पाणी फेरले आहे. मी सतत दोन वर्षे वैद्यकीय प्रवेशासाठी अभ्यास केला; पण आज माझ्या हाती निराशा आली. माझे वडील मध्यमवर्गीय आहेत. लाखो रुपये फी भरून मला वैद्यकीय शिक्षण नाही देऊ शकणार. तर नीट परीक्षा मंडळाच्या गोंधळामुळे माझ्यासह सर्व कुटुंबीय नैराश्येत आले आहे, अशी प्रतिक्रिया श्वेता हिने दिली.

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालEducationशिक्षण