शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिला दिलासा

By admin | Updated: August 18, 2015 23:47 IST

चॉकलेट, गोळ्या, बिस्किटांऐवजी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात दुष्काळी भागातील, डोक्यावर पाणी घालून डाळिंबाच्या बागा जगविणारे हरितक्रांती फार्मर्स क्लब, उंबरगाव

पिंपरी : चॉकलेट, गोळ्या, बिस्किटांऐवजी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात दुष्काळी भागातील, डोक्यावर पाणी घालून डाळिंबाच्या बागा जगविणारे हरितक्रांती फार्मर्स क्लब, उंबरगाव, (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील शेतकऱ्यांची डाळिंबे विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा अभिनव उपक्रम माणमधील अभिनव फार्मर्स क्लबतर्फे राबविण्यात आला. या उपक्रमातून होणाऱ्या डाळिंबविक्रीचे सर्व पैसे उंबरगाव येथील शंकर पवार आणि त्यांच्या फर्ममधील शेतकऱ्यांना देण्यात आले.डाळिंब विकत घेऊन माण तालुक्यातील सुनील नामदेव भरणे, माजी उपसरपंच माण आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांनी जिल्हा परिषद शाळा, माण येथील २००० विद्यार्थ्यांना डाळिंबवाटप करून सोलापूरच्या शेतकऱ्यांना मदत केली आहे.मुळशी तालुक्यातील सुरेश हुलावळे यांनी या शेतकऱ्यांची डाळिंब विकत घेऊन हिंजवडी, माण अपंग शाळा, चांदे, नांदे, मूलखेड, घोटवडे येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये वाटप करून शेतकऱ्यांना मदत केली.माण येथील सामाजिक कार्यकर्ते राम बोडके यांनी जिल्हा परिषद शाळा, बोडकेवाडी येथील १५० विद्यार्थी व नागरिकांना वाटून एक वेगळा उपक्रम येथे सुरू केला आहे. अशोक अप्पा साठे यांनी पिंपरी-चिंचवडमधील वेगवेगळ्या शाळांमध्ये डाळिंब विकत घेऊन वाटप करण्यात आले. चॉकलेटऐवजी डाळिंब मिळाल्याने विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला. डाळिंबामुळे हिमोग्लोबीनमध्येही वाढ होते.चंद्रकांत भूमकर भूमकरवस्ती यांनीही भूमकरवस्तीवरील शाळेमध्ये डाळिंबवाटप करून शेतकऱ्यांना मदत केली. अशा पद्धतीने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यामध्ये ५ टन डाळिंबांचे वाटप करून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून दिली. अभिनव फार्मर्स क्लबच्या या उपक्रमाचे ज्ञानेश्वर बोडके, शंकर पवार, भानुदास वैराट यांनी कौतुक केले. (प्रतिनिधी)