- आकाश झगडे
पिंपरी : शहरात उन्हाचा पारा वाढल्याने नागरिक जलतरण तलावांकडे वळत आहेत. महापालिकेचे १३ जलतरण तलाव असून, नूतनीकरण झालेल्या तलावांमध्ये सोयीसुविधा असल्या तरी, इतर ठिकाणी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. ऑनलाइन बुकिंगच्या तांत्रिक अडचणी, पिण्याच्या पाण्याचा अभाव, स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता यामुळे पोहायला येणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तलाव ठेकेदारांच्या हवाली करून महापालिका प्रशासन जबाबदारी झटकत आहे. काही तलावांवर ऑनलाइन बुकिंगसाठी संकेतस्थळ आणि क्यूआर कोड लावले आहेत. मात्र, प्रत्यक्षात ती संकेतस्थळे उघडतच नाहीत. याबद्दल महापालिकेशी संपर्क साधला असता, ‘आमच्याकडून ऑनलाइन बुकिंग बंद आहे, प्रत्येक ठेकेदाराचे स्वतंत्र संकेतस्थळ आहे, त्यांच्याशीच संपर्क करा’, असे उत्तर दिले जात आहे.
निगडी प्राधिकरणातील श्री छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोयही नाही. नेहरूनगरमध्ये तर परिस्थिती अधिक गंभीर असून, येथील स्वच्छतागृहांना टाळे लावण्यात आले आहे. याच ठिकाणी पोहून झाल्यानंतर शरीरावरील क्लोरिनयुक्त पाणी काढण्यासाठी शॉवर घेऊ दिला जात नाही, असा आरोप नागरिकांनी केला.
शहरातील तेरा जलतरण तलाव
श्री छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव - निगडी प्राधिकरण.साई ॲक्वामरीन जलतरण तलाव - संभाजीनगर, चिंचवड.राजर्षी शाहू महाराज जलतरण तलाव - मोहननगर, चिंचवड.कै. वस्ताद बाळासाहेब गावडे जलतरण तलाव - केशवनगर, चिंचवड.कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम तलाव - नेहरूनगर, पिंपरी.कै. बाळासाहेब लांडगे जलतरण तलाव - भोसरी.संत ज्ञानेश्वर महाराज जलतरण तलाव - वडमुखवाडी, चऱ्होली.यमुनानगर जलतरण तलाव - यमुनानगर, निगडी.खिंवसरा पाटील जलतरण तलाव - थेरगाव.पिंपरी वाघेरे जलतरण तलाव - पिंपरी गाव.कै. बाळासाहेब शितोळे जलतरण तलाव - सांगवी.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव - कासारवाडी.कै. काळूराम जगताप जलतरण तलाव - पिंपळे गुरव.
सूचना शुक्रवार व रविवारची, बंद सोमवारीनेहरूनगरमधील कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम तलावाच्या प्रवेशद्वारावर तलाव शुक्रवारी बंद असल्याचे लिहिण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला निळ्या बोर्डवर रविवारी बंद असल्याची सूचना आहे. प्रत्यक्षात मात्र हा तलाव सोमवारी बंद असतो. नवीन पोहायला येणाऱ्या नागरिकांमध्ये यामुळे गोंधळ निर्माण होत आहे. या ठिकाणी उत्तम सोय
पिंपरी गावामधील पिंपरी वाघेरे जलतरण तलाव, पिंपळे गुरवमधील कै. काळूराम जगताप जलतरण तलाव, वडमुखवाडीमधील संत ज्ञानेश्वर महाराज जलतरण तलाव, मोहननगरमधील राजर्षी शाहू महाराज जलतरण तलाव, सांगवीतील कै. बाळासाहेब शितोळे जलतरण तलाव येथे उत्तम सोय आहे. तलावात स्वच्छ पाणी स्वच्छतागृहे, शॉवर रूम, पिण्याचे पाणी या सुविधा आहेत.
पाण्याची कमतरता असल्याने काही ठिकाणी स्वच्छतागृह बंद आहेत. बाकी सर्व सोयीसुविधांसाठी आमच्याकडूनही प्रयत्न करण्यात येतील व संबंधित ठेकेदारांना सूचना देण्यात येतील. - पंकज पाटील, क्रीडा उपायुक्त.
Web Summary : Pimpri-Chinchwad pools see crowds amid rising heat, but many lack basic amenities. Online booking issues, water scarcity, and unclean restrooms plague users. The municipality shifts responsibility to contractors, while some pools offer excellent facilities.
Web Summary : पिंपरी-चिंचवड के पूल बढ़ती गर्मी के बीच भीड़ से भरे हैं, लेकिन कई में बुनियादी सुविधाओं की कमी है। ऑनलाइन बुकिंग में समस्या, पानी की कमी और अस्वच्छ शौचालय उपयोगकर्ताओं को परेशान करते हैं। नगरपालिका ठेकेदारों पर जिम्मेदारी डाल रही है, जबकि कुछ पूल उत्कृष्ट सुविधाएं प्रदान करते हैं।