Crime News : पिंपरीत मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारे दोघे जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 16:02 IST2026-04-26T15:54:24+5:302026-04-26T16:02:15+5:30

Crime News : हिंजवडी पोलिसांनी जप्त केल्या नऊ दुचाकी, लॅपटाॅप, मोबाइल

Crime News Two arrested for stealing two-wheelers for fun in Pimpri | Crime News : पिंपरीत मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारे दोघे जेरबंद

Crime News : पिंपरीत मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारे दोघे जेरबंद

पिंपरी : चैनीसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चार लाख २५ हजार रुपये किमतीच्या नऊ दुचाकी, एक लॅपटॉप आणि मोबाइल फोन जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे हिंजवडी, वाकड आणि चिंचवड परिसरातील वाहनचोरीचे १० गुन्हे उघडकीस आले आहेत.

आदित्य संतोषकुमार पटेल (वय २३, रा. बोडकेवाडी, माण, ता. मुळशी, मूळ रा. छत्तीसगड) आणि ओम किशोर चिस्तळकर (वय १९, रा. बोडकेवाडी, माण, ता. मुळशी, मूळ रा. वाशिम) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस पथक गस्त घालत होते. २० एप्रिल रोजी बोडकेवाडी फाट्याजवळ एक तरुण विनानंबर प्लेटच्या दुचाकीसह संशयास्पदरीत्या उभा असल्याचे आढळले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला.

केवळ मौजमजेसाठी दुचाकी चोरी केल्याची संशयितांनी कबुली दिली आहे. त्यांनी हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आठ, वाकडमध्ये एक आणि चिंचवडमध्ये एक असे एकूण १० गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीच्या नऊ दुचाकींसह इतर साहित्य जप्त केले.

पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, निरीक्षक (गुन्हे) ऋषिकेश घाडगे, सहायक निरीक्षक सोमनाथ पांचाळ, दुर्गानाथ साळी, उपनिरीक्षक अशोक दुधवणे, सहायक फौजदार नरेश बलसाने, चिंतामण जोशी, पोलिस अंमलदार संदीप मासाळ, कैलास केंगले यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Web Title : पिंपरी: मौजमस्ती के लिए बाइक चोरी करने वाले दो गिरफ्तार

Web Summary : पिंपरी में दो शातिर बाइक चोर गिरफ्तार; नौ बाइक, लैपटॉप, मोबाइल जब्त। आरोपियों ने मौज-मस्ती के लिए चोरी करना कबूल किया, हिंजवडी, वाकड और चिंचवड में 10 मामले सुलझे।

Web Title : Pimpri: Two arrested for stealing bikes for fun.

Web Summary : Two serial bike thieves arrested in Pimpri; nine bikes, laptop, mobile seized. The accused confessed to stealing for fun, solving 10 cases in Hinjewadi, Wakad, and Chinchwad.