शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
4
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
5
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
6
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
7
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
8
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
9
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
10
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
11
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
12
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
13
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
14
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
15
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
16
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
17
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
18
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
19
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
20
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus Vaccine : एका केंद्रावर दिवसाला शंभर जणांना टोचणार लस; पिंपरी शहरातील सोळा केंद्र सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 12:24 IST

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण करण्यात येणार आहे.

पिंपरी : औद्योगिकनगरीत १६ जानेवारीपासून कोरोनाचे लसीकरण सुरु होणार आहे. शहरात सोळा लसीकरण केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. एका केंद्रावर दिवसाला शंभर अशा १६०० जणांना लस टोचविण्यात येणार आहे. कोरोना वॉरीयर्स, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य सेवा देणा-या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे.

.....

अशी आहेत केंद्र
शहरात सोळा केंद्र तयार केली आहेत. त्यात खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे. त्यात वायसीएम रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, यमुनानगर रुग्णालय, नेहरुनगर दवाखाना, तालेरा रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, ईएसआयएस रुग्णालय, कामत हॉस्पीटल, जुने भोसरी रुग्णालय, कासारवाडी दवाखाना या शासकीय रुग्णालयात तसेच डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी, अक्वॉर्ड संत ज्ञानेश्वर हॉस्पीटल भोसरी, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पीटल थेरगाव, स्टर्लिंग हॉस्पीटल अ‍ॅण्ड आयुर्वेद मेडिकल कॉलेज यांचा समावेश आहे. तसेच पिंपळेनिलख दवाखाना, प्रेमलोक पार्क दवाखाना या ठिकाणी आरोग्य सेवा देणा-या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांचे लसीकरण होणार आहे.
..............................
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नागरिकाने दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. फोटो आयडी तपासला जाईल. त्यानंतर लस देण्यात येईल. लस दिल्यानंतर अधार्तास देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर काही त्रास होत नसल्यास घरी सोडण्यात येईल. लसीकरणासाठी परिचारिका, आशा वर्कर यांची नेमणूक केली आहे. गोंधळ होवू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात येणार आहे.

डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याshravan hardikarश्रावण हर्डिकर