शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन शुल्क विभागाने अडवलेला मद्याचा कंटेनर दमदाटी करून नेला; दरोड्याचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 15:57 IST

गोव्यामध्ये बनविलेले मद्य राज्यात उत्पादन शुल्क चुकवून आणले जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.

ठळक मुद्देतळेगाव पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल..

पिंपरी : गोव्यावरून उत्पादन शुल्क चुकवून आणलेला मद्याचा कंटेनर उत्पादन शुल्क विभागाने अडविला. मात्र कारवाई सुरू असताना दोन चारचाकी वाहनातून आलेल्या पाच जणांना दमदाटी करून कंटेनर पळवून नेल्याची तक्रार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक योगेश नानभाऊ फटांगरे ( वय ४८, रा. वेस्टर्न हाईट्स, मसाला गल्ली, लालबाग मुंबई) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कंटेनर (एमच २०, डिई ०२०७) मधील दोन इसम, होंडा सिटी कार ( एमएच १२ डीएम २०२० ) मधील तीन इसम आणि सॅन्ट्रो कार (एमएच १२ सीडी २८१३) मधील दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोव्यामध्ये बनविलेले मद्य राज्यात उत्पादन शुल्क चुकवून आणले जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागाच्या पथकाने एक ऑक्टोबरला रात्री सापळा रचला. त्यानुसार कंटेनर ताब्यात घेऊन तळेगाव येथील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात घेऊन गेले. त्यानंतर तिथे दोन चारचाकी गाडीतून आलेल्या व्यक्तींनी दमदाटी करून कंटेनर नेला. त्यात पन्नास लाख रुपयांचे मद्य असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मद्य आणि वीस लाख रुपयांचा कंटेनर जबरदस्तीने नेल्याची तक्रार दिली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडliquor banदारूबंदीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी